नांदेड ट्रॅफिक समस्या व समाधान

जुर साहिब नांदेड शहर हे गुरू गोबिंदसिंघजी यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली भूमी आहे. आज नांदेड शहराचा विकास अतिशय वेगाने होत आहे. भविष्यामध्ये नांदेड शहर उद्योग व्यवसायासाठी उद्योगपतीचे आवडते शहर राहणार व पर्यटन स्थळ पण होणार यात शंका नाही कारण त्यासाठी ज्या सोयी सुविधा लागतात त्या सर्व सुविधा डॉ.शंकरराव चव्हाण यांनी निर्माण केले व त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव व सर्वांचे लाडके नेते अशोकराव चव्हाण हे सुद्धा आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे. ह्या सर्वा सोबत नांदेड शहर स्वच्छ, सुंदर व टॅफिक मुक्त झाले पाहिजे यासाठी सर्वांना मिळुन कार्य करणे आवश्यक आहे, या साठी अशोकराव चव्हाण साहेब व डॉ.अजीत गोपछडे साहेब हे वरील स्तरावर प्रयत्न करीत आहेतच परंतु नांदेड ट्रॅफिक  समस्येसाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे सुद्धा आवश्यक आहे.
या विषयावर खूप दिवसापासून लिहण्याचे मनात विचार होते परंतु योग येत नव्हता. तसे या विषयावर म्हणजे मी दिलेल्या शिर्षकाच्या पहिल्या भागावर भरपूर लोक लिहतात, रोज टिका टिप्पणी सुद्धा करातात. ते म्हणजे नांदेड ट्रॅफिक समस्या परंतु उपाय योजनेवर कोणीही लिहित नाही, त्यामुळे माझा हा छोटासा प्रयत्न.
सर्व प्रथम मी सचखंड श्री हजुर अबचलनगर, साहिब गुरूद्वारापासून सुरूवात करेन. सर्वांना माहित आहे, आपल्या येथील गुरूद्वारा हा सिख धर्माचा प्रमुख तख्त पैकी हे एक आहे व या ठिकाणी दररोज असंख्य भावीक देश-विदेशातून येतात परंतु या ठिकाणी गुरूद्वारा प्रवेशद्वारासमोर असंख्य वाहने उभी राहतात त्यामुळे लोकांना पायी चालने सुद्धा अवघड होत आहे, त्याचे कारण या वाहनासाठी पार्किंग सुविधा नाही. या विषयावर मी एकदा डॉ.पसरीचा तत्कालीन प्रशासक यांना भेटून उपाय-योजना सुचविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी नंतर येवून भेट असे म्हटले, मी डॉ.सतबीर सिंघ यांना सुद्धा मित्राच्या माध्यमाने सांगीतले आहे.
या समस्येवर तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. या ठिकाणी एक चांगला प्लॅन व त्याची ब्ल्युप्रिंट बनवून तात्काळ ट्रॅफीक समस्या सोडविण्यासाठी येणाऱ्या 50 वर्षाचा विचार करून भव्य-दिव्य पार्कींगसाठी आधुनिक पार्कींग स्टॅन्ड व भावीकांचे आगमन व निर्गमनचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. गुरूद्वारा समोरचा मुख्य प्रवेश द्वार सुद्धा जुन्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी असावा जेणे करून गोदावरीला जाण्यासाठी जुना व ऐतिहासिक रस्ता पुर्वी सारखा राहिल व हा रोड नो-व्हेहिकल झोन करावा.
त्यानंतर, सर्व शहरामध्ये ट्रॅफिकची समस्या निर्माण होण्याचे मुख्य, कारण ते म्हणजे नांदेडच्या प्रत्येक प्रमुख मार्केटमध्ये रोडसमोर भव्य-दिव्य व्यवसायीक इमारती उभारण्यात येत आहे व त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची वाहने ही मुख्य रस्त्यावर लावण्यात येतात कारण नांदेडमध्ये माझ्या माहितीप्रमाणे  70 टक्के व्यवसायीक इमारतीच्या पार्कींग सुविधा नाही. काही व्यापाऱ्याकडे आहे परंतु त्याच्या वापर होत नाही किंवा दुसऱ्या कामासाठी होतो.
मी नांदेड शहरातील प्रमुख रस्ते व विविध इमारतीबाबत उदा. म्हणून नमुद करतो जसे की, वजिराबाद  येथीलठिकाणी व्यापारी इमारतींचे नाव घेत नाही परंतु बहुतांश दुकानाची त्यांची पार्कींग नसल्यामुळे पूर्ण वाहने मुख्य रस्त्यावर राहतात, त्यानंतर डॉ.लेन येथे बहुतांश हॉस्पीटल आहेत. परंतु पार्किंग असून नसल्यासारखी आहे. शिवाजीनगर ते आयटीआय या ठिकाणी मोठ्या शॉपींग मॉल आहे, परंतु वाहने थाटात मुख्य रस्त्यावर असतात. आयटीआय ते अण्णाभाऊ साठे चौक या रोडवर हॉटेल वइतर दुकाने आहे, वाहने रोडवर संध्याकाळी तर काही हॉटेलसमोर वाहनांची तुफान गर्दी असते, त्यानंतर बसस्टँड ते बाफना रोड या भागात गॅरेज आहेत या ठिकाणी तर वाहने पुर्ण मुख्य रस्त्यावरच असतात. आयटीआय ते वर्कशॉपकॉर्नर, वकॅर्शाप ते भाग्यनगर, आनंदनगर त्या त्या भाग्यनगर ते कॉलेजरोड या ठिकाणी जवळपास सर्व नामांकित ट्युशन क्लासेस आहेत.  परंतु बहुतांश ठिकाणी विद्यार्थ्यांची वाहने रोडवर पार्किंग केलेली असतात ही अवस्था अख्या नांदेडच्या प्रत्येक रोड, मुख्य रस्ता, कॉलनी व बाजारपेठेत आहे.
परंतु याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे.
यासाठी नांदेड मनपाला कडक पावले उचलावी लागतील व भविष्यामध्ये हि समस्या प्रत्येक शहरांची होणार आहे या करीता आपण नांदेडपासून सुरूवात करू या,लवकरच देशामध्ये यासाठी कठोर कायदा सुद्धा आणावा लागेल.
मनपाने ज्या दुकानासाठी जो ग्राहक आलाअसेल त्याचे वाहन त्या दुकानाच्या पार्किंगमध्ये ठेवणे अनिवार्य करायला पाहिजे वव्यापारी संकुलच्या दुकानांची व येणाऱ्या ग्राहकांची संख्येनुसार पार्किंग सुविधा त्या-त्यादुकान मालकांना करणे अनिवार्य असायला पाहिजे. या व्यतिरिक्त मनपाने त्यांच्या मोकळ्या जागेत भव्यदिव्य पे-पार्किंग उभारायला पाहिजे.
हॉकर झोन सुद्धा उभारून छोट्या व्यापारी व दैनंदिन फेरीवाले यांना पालिकेने जागा सुनिश्चित करून देणे, एक ही फेरीवाला मुख्य रस्त्यावर नसावे यासाठी उपाय योजना करावे.
नांदेडमध्ये ट्रॅफिकसाठी अडथळा निर्माण होणारे अजुन एक समस्या म्हणजे आठवडी बाजार. आज आठवडी बाजार याची ज्याखी वाढली आहे. रोज नांदेडच्या एक भागात आठवडी बाजारच्या नावाने बाजार भरतो, या बाबत मी मनपा मधील आमच्या मित्रांना पूर्वीसुद्धा सांगितले होते की, मुख्य रस्त्यावर बाजार नसावा, आपण बघीतले, मनपाचे कर्मचारी रस्ता सुरळीत करून बाजार इतर ठिकाणी स्थलांतर करण्याच्या प्रयत्न केला तर किती त्रास झाला.
नांदेडमध्ये ज्या प्रमाणे मनपाचे झोन आहेत, त्याप्रमाणे प्रत्येक झोनमध्ये मनपाने त्यांच्या मोकळ्या जागेत बाजारसाठी जागा उपलब्ध करून देणे व मुख्य रस्त्यावरचे सर्व भाजीपालावाल्यांना प्रतिबंधीत करणे आवश्यक आहे.
त्यानंतर आपण नांदेडच्या मुख्य रस्त्याबद्दल बोलु या, सध्या नांदेडचे मुख्य रस्त्याचे काम सुय असल्यामुळे आपणास त्रास होत आहे हे सत्य आहे परंतु रस्ते चांगले होणे सुद्धा आवश्यक आहे. सोबत त्या-त्या गुत्तेदाराची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांनी वेळेवर कार्य पुर्ण करावे व काम सुरू असताना वाहनधारकांना पर्यायी रस्ता सुरळीत करून देणे, सायकल ट्रक काढण्यात येत असल्यामुळे रस्ता विस्तारीत होत आहे.
नांदेड येथे रस्त्यांचे जे विभाजक (डिवायडर) आहेत हे प्रत्येक दुकानदारांच्या सोयीनुसार मधून मोकळे आहे, यामुळे कोणताही वाहनचालक सुद्धा वाहन काढतो त्यामुळे अपघात व ट्रॅफिक जॅम होते या करीता डिवायडर फक्त मुख्य चौकातून किंवा मिटरप्रमाणे निर्धारीत करून तसे बोर्ड लावले पाहिजे. उदाहरण म्हणून अण्णाऊ साठे चौक ह्या ठिकाणी चौकात डिवायझर मोकळे असल्यामुळे रोज टॅफिक जाम होत आहे.
नांदेड येथे ट्रॅफिक सिग्नल आहेत परंतु खूप चौकामध्ये डिवायडर मोकळे असल्यामुळे वाहनधारक वाहनमधून काढतात व ट्रॅफिक जाम होते व सिग्नल प्रमाणे कार्य होत नाही व त्यामुळे ट्रॅफिक पोलिसांना सिग्नल बाजुला ठेवून वाहने मोकळी करावी लागतात, वाहने मोकळी करण्याच्या कामामुळे त्यांचे जे मुख्य कार्य आहे सिग्नल कोण मोडत आहे व मुख्य म्हणजे प्रत्येकाने नियमाप्रमाणे ज्या साईडला जायचे आहे त्याप्रमाणे किमान 100 मिटरपूर्वी त्या लेनमध्ये  असावे व रस्त्याच्या डाव्यासाईडची लाईन मोकळी असावी, परंतु त्या लाईनवरच भरपूर वाहने उभी असतात व त्या वाहनधारकांवर कोणतेही कार्यवाही होत नसल्यामुळे नांदेडमध्ये सऱ्हास लाईन तोडणयाचे प्रकार होतात, या करीता सुद्धा मनपाने मुख्य चौकामध्ये किमान शंभर मिटरपर्यंत ज्याप्रमाणे रेस्टहाऊस जवळ खंबे/खुना/निशाणी करण्यात आले त्याप्रमाणे प्रत्येक चौकात शिवाणी करण्यात आली पाहिजे.
ज्या ठिकाणी ब्रेकरची आवश्यकता आहे त्या ठिकाणी सर्वे करून मनपाने ब्रेकर लावले पाहिजे.
मोटार सायकल वइतर वाहनाची वेग मर्यादा निश्चीत करून चौकामध्ये तपासणी करून दंड आकारले पाहिजे. नांदेड येथील ॲटोचालकांना शिस्त लावणे अतिशय आवश्यक, त्यांचे थांबे व मार्ग सुद्धा ठरविणे आवश्यक आहे.
मोठी (जड) वाहने सकाळी 9 ते रात्री 9च्या दरम्यान शहरात येवू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे.
नांदेड येथील बस स्टँड बाहेर स्थलांतर करणे काळाची गरज आहे.
नांदेड येथे छोट्या सिटी बसेस प्रदूषणमुक्त आणून सिटी बसचीसेवा सुरू करणे आवश्यक आहे. नांदेडच्या काही भागाचे सर्वे करून फलायओव्हर ओव्हरची निर्मिती करणे आवश्यक आहे.
असे भरपूर उपाययोजना नांदेडच्या स्वच्छ, सुंदर व ट्रॅफिक मुक्त शहर करण्यासाठी करावे लागतील या साठी सर्वांना मिळून कार्य करावे लागेल. नांदेडच्या संबंधीत अधिकाऱ्यांनी एक संयुक्त टिम बनवून प्रत्यक्ष फिरून प्रत्येक समस्याची नोंद करून शॉर्ट-टर्म व लाँग-टर्म प्लान बनवावे, तात्काळ ज्या उपाययोजना करता येतात, त्या केल्या पाहिजे, मी एक सामान्य नागरीक म्हणून व मला ज्या समस्यांचे समाधान करता येवू शकतात, त्या सुचविण्याचा प्रयत्न केला. शेवटी एवढेच सांगेल, ही फक्त ट्रॅफिक पोलीस किंवा फक्त मनपाची जबाबदारी नसून ट्रॅफिक मुक्त स्वच्छ व सुंदर नासंदेड शहर ठेवण्याची जबाबदारी आमची सर्वांची आहे.
लेखक –
डॉ.प्रा.राजवंतसिंघ कदम्ब
नांदेड. मो. 9422173342

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!