नांदेड – सत्यशोधक समाज प्रतिष्ठान, युवा प्रबोधन मंच, अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद, रिपब्लिकन हक्क परिषद, राष्ट्रीय ढोर समाज संघटना तथा विविध परिवर्तनवादी सामाजीक संस्था नांदेडच्यावतीने ज्येष्ठ विचारवंत, अन्यायाविरूद्ध झुंज देणारा संघर्ष योद्धा, असंघटीत कामगारांचा आधारवड, फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचा सच्चा साथी पांडूरंग उर्फ बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दि.8 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी ठिक 5 वाजता प्रा.डॉ.अनंत राऊत यांचे युगांतर या निवासस्थानातील सभागृह व्यंकटेशनगर नांदेड येथे श्रृद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.अनंत राऊत हे होते तर विचारपीठावर सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे नांदेड जिल्हाध्यक्ष दत्ता तुमवाड, श्रीमती डॉ.पुष्पा कोकीळ, लेखीका श्रीमती डॉ.लक्ष्मी पुरणशेट्टीवार, अण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेचे नांदेड जिल्हाध्यक्ष डॉ.विठ्ठल भंडारे, रिपब्लीकन हक्क परिषदेचे रमेश सोनाळे, राष्ट्रीय ढोर समाज संघटनेचे राज्य सचिव एस.पी.कांबळे, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रा.विठ्ठल दहिफळे, बालाजी पोतुलवार,सदाशिव आढेराव, श्रीमती डॉ.लक्ष्मी पुरणशेट्टीवार यांनी आपले मनोगत व्यक्त करून बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिली. शेवटी अध्यक्षीय समारोप प्रा.डॉ.अनंत राऊत यांनी करून बाबा आढाव यांच्या प्रती सखोल असे अभ्यासपूर्वक विचार मांडले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता तुमवाड यांनी केले तर सुत्रसंचालन गुणवंत एच.मिसलवाड यांनी केले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ.विठ्ठल भंडारे, दत्ता तुमवाड, प्रा.डॉ.अनंत राऊत, डॉ.पुष्पा कोकीळ, लेखीका डॉ.लक्ष्मी पुरणशेट्टीवार, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड, विठ्ठल असोरे, पांडूरंग नरवाडे, पिराजी सोनटक्के, गौतम भंडारे, बालासाहेब भोपाळे, दत्ता चापलकर, बालाजी पोतुलवार, प्रा.विठ्ठल दहिफळे, सदाशिव आडेराव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी विविध परिवर्तनवादी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सत्यशोधक समाज बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध परिवर्तनवादी सामाजिक संस्था नांदेड तर्फे दिवंगत बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली
