नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील यशनगरी प्रथमेश अपार्टमेंट काबरानगर परिसरातील रहिवासी तथा ज्येष्ठ महिला सुलोचना प्रभाकर देशमख यांचे वृध्दापकाळाने दि. ९ डिसेंबर मंगळवारी सकाळी ९.३० वाजता राहत्या घरी निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात २ मुले,३ सुना, २ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा मंगळवारी दि. ९ रोजी सायंकाळी ४.३० च्या सुमारास राहते घर प्रथमेश अपार्टमेट यशनगरी, काबरानगर परिसर येथून निघाली. त्यांच्या पार्थिवावर शांतीधाम स्मशानभूमी गोवर्तनघाट नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील गणपती मंदिराचे मुख्य पुजारी कांतू महाराज देशमुख व दैनिक पुण्यनगरी नांदेड कार्यालयातील कर्मचारी शशिकांत देशमुख यांच्या त्या आई होत. Kanthak Suryatal Post Views: 759 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मनीष कांबळेंच्या वाढदिवसाला एजे ग्रुपकडून समाजसेवेची सुंदर भेट विविध परिवर्तनवादी सामाजिक संस्था नांदेड तर्फे दिवंगत बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली