नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील यशनगरी प्रथमेश अपार्टमेंट काबरानगर परिसरातील रहिवासी तथा ज्येष्ठ महिला सुलोचना प्रभाकर देशमख यांचे वृध्दापकाळाने दि. ९ डिसेंबर मंगळवारी सकाळी ९.३० वाजता राहत्या घरी निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात २ मुले,३ सुना, २ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा मंगळवारी दि. ९ रोजी सायंकाळी ४.३० च्या सुमारास राहते घर प्रथमेश अपार्टमेट यशनगरी, काबरानगर परिसर येथून निघाली. त्यांच्या पार्थिवावर शांतीधाम स्मशानभूमी गोवर्तनघाट नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील गणपती मंदिराचे मुख्य पुजारी कांतू महाराज देशमुख व दैनिक पुण्यनगरी नांदेड कार्यालयातील कर्मचारी शशिकांत देशमुख यांच्या त्या आई होत.
More Related Articles
मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचा दौरा
नांदेड -राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत…
तीन दिवसात दोन एटीएम फोडण्याचे प्रयत्न
नांदेड(प्रतिनिधी)-रविवार ते मंगळवार या तिन दिवसांमध्ये दोन ठिकाणी एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. याबद्दल काय…
नांदेड जिल्हा ग्रंथालय कार्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा
नांदेड,(जिमाका)- जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यात आला. यावेळी ग्रंथ प्रदर्शनाचे…
