प्रशांती सार्वजनिक वाचनालय आयोजित बालवाचक सभासद सत्कार व फिरते वाचनालय (साखळी) योजना शुभारंभ नांदेड – प्रशांती सार्वजनिक वाचनालय, आनंद नगर यांच्यावतीने, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित श्री सत्य साईबाबा प्राथमिक विद्यालय, आनंद नगर येथे बालवाचक सभासद सत्कार, फिरते वाचनालय (साखळी) योजना शुभारंभ व शाळा दत्तक योजना कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ. वा. सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना “वाचनाने बुद्धीचा विकास होतो आणि स्मरणशक्ती तेज होते” असे मत व्यक्त करून वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले.वाचनालयाचे अध्यक्ष रावसाहेब शेंदारकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना पुस्तकांकडे ओढ निर्माण करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक अष्टेकर एस. एस., शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. Kanthak Suryatal Post Views: 755 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation माळेगाव यात्रेत भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सूक्ष्म नियोजन करा – राहुल कर्डिले “नदी लुटणाऱ्यांचा पर्दाफाश!”-“गोदावरी-सीता काठावर अवैध वाळूमाफियांची धांदल”