श्री क्षेत्र माळेगाव यात्रा पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न यात्रेच्या सर्वागिण सुविधेसाठी सर्व विभागांचे सुक्ष्म नियोजन व समन्वय आवश्यक नांदेड – दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या लोहा तालुक्यातील श्री खंडोबा देवस्थान, माळेगाव येथील यात्रा दिनांक 18 ते 24 डिसेंबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून यात्रेत सर्व सुविधा उपलब्ध राहतील, यासाठी संबंधित सर्व विभागांनी सुक्ष्म नियोजन करून समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या पूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यात्रेच्या पहिल्या दिवशी म्हणजे 18 डिसेंबर रोजी देवस्वारी व पालखी पूजन होईल व दुसऱ्या दिवशी पशुप्रदर्शन व दुग्धस्पर्धा यांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात्रेच्या कालावधीत भाविकांसाठी आवश्यक सर्व सुविधा प्रशासनाच्यावतीने उपलब्ध करण्यात येणार आहेत. यात्रेच्या सोयीसुविधांबाबत पशुसंवर्धन, कृषी, पोलीस प्रशासन, बीएसएनएल, महावितरण, परिवहन, आरोग्य विभाग आदींच्या कामांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, अपर जिल्हाधिकारी रत्नदिप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गिरी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, उपआयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रविणकुमार घुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत , माळेगावचे सरपंच प्रतिनिधी हणमंत धुळगंडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आदीची उपस्थिती होती. यात्रेत विविध विभागांचे स्टॉल यात्रेत भाविकांना शासनाच्या योजनांची माहिती मिळावी म्हणून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, महाविस्तार ॲप, ॲग्रीस्टॅक, आयुष्यमान भारत, महिला व बाल विकास विभाग,पशूसंवर्धन विभाग यांचे स्टॉल उभारण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. तसेच भाविकांना इंटरनेट सेवा अखंडित मिळावी यासाठी बीएसएनएलने वायफाय व नेटवर्क व्यवस्थेचे विशेष नियोजन करावे, अशाही सूचना देण्यात आल्या. महत्त्वाच्या सुविधा व कामे यात्रेच्या काळात पुढीलप्रमाणे सुविधा उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिली. यात सीसीटीव्ही, वॉशरूम, बॅरिकेट व्यवस्था, मंदिराकडे जाणाऱ्या बायपास रस्त्याची दुरुस्ती, हेलिपॅड, स्वच्छतेसाठी मोबाईल व्हॅन, विविध स्पर्धा व पशुप्रदर्शनासाठी लागणारा निधी याबाबतची माहिती त्यांनी दिली. यावेळी विविध विभागांना यात्रेच्या अनुषंगाने करण्यात आलेले नियोजनाची माहिती यावेळी दिली. यात्रा परिसरातील कला महोत्सव, मंदिर परिसर, कुस्ती मैदान, कृषी व पशुप्रदर्शन विभाग, बसस्टॅण्ड येथे चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची व नियोजनाची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी दिली. यात्रेच्या अनुषंगाने लागणाऱ्या सुविधाबाबतची माहिती माळेगावचे सरपंच श्री. धुळगुंडे यांनी यावेळी केली. Kanthak Suryatal Post Views: 997 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation गुरुवारी बाल सुरक्षा, सकारात्मक शिस्त यांवर आधारित शिक्षण परिषदेचे आयोजन वाचनाने बुद्धीचा विकास होतो – अ. वा. सूर्यवंशी