नांदेड(प्रतिनिधी)- 3 डिसेंबर रोजी रात्री 7.30 वाजेच्यासुमारास मौजे राजूरा (बु) ता.मुखेड येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन बालकाच्या खून प्रकरणात आरोपी म्हणून दुसरा अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालक त्याच्यासोबत मंगेश माधवराव इंगळे व इतर लोकांची नावे आरोपीच्या सदरात आहेत.
मुक्रामाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार्या एका अल्पवयीन बालकाच्या पित्याने दिलेल्या तक्रारीनुसार 3 डिसेंबर रोजी रात्री 7.30 वाजता त्यांच्या बालकाला राजूरा (बु) ता.मुखेड येथे एका अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालक त्याच्यासोबत मंगेश माधवराव इंगळे आणि इतर अनोळखी लोकांनी मिळून जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. मुक्रमाबाद पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 214/2025 दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.
आज सकाळीच देगलूर नाका जवळ एक युवक मृतअवस्थेत सापडला आहे. अद्याप त्या युवकाचा खून झाला होता की, आकस्मात मृत्यू आहे हे स्पष्ट झाले नाही. पण अशा मृत्यू प्रकरणी सुरूवातीला आकस्मात मृत्यूचीच नोंद होते. तशी तिही झाली आहे आणि रात्री या अल्पवयीन बालकाचा खून झाला. जवळपास प्रत्येक आठवड्यामध्ये नांदेड जिल्ह्यात अशी रक्तरंजित घटनाक्रमे घडतच आहेत. यावरून कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे असे लिहिले तर ते वावगे ठरणार नाही.
अल्पवयीन बालकाने इतरासोबत मिळून अल्पवयीन बालकाचा खून केला
