नांदेड(प्रतिनिधी)-बस प्रवासादरम्यान एका महिलेच्या बॅगमधून चोरट्यांनी 1 लाख 82 हजारांची चोरी केली आहे. हा प्रकार शहरातील रेल्वे स्थानकासमोर घडला. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बळीरामपूर येथील एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 66 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.
मिनाबाई साहेबराव दरबस्तेवार या महिला 2 डिसेंबर रोजी दुपारी नरसी ते नांदेड असा बस प्रवास करून नांदेडला येत असतांना रेल्वे स्थानकाजवळ ती बस थांबवली असतांना त्यांच्या पर्समधील सोन्याचे दागिणे 1 लाख 82 हजार रुपये किंमतीचे कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेले आहेत. वजिराबाद पोलीसांनी या तक्रारीनुसार गुन्हा क्रमांक 490/2025 दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.
संजय पांडूरंग चौदंते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.1 डिसेंबरच्या सायंकाळी 5 ते 2 डिसेंबरच्या पहाटे 3 वाजेदरम्यान बळीरामपुरमधील त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कोणी तरी चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 66 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 1160/2025 प्रमाणे दाखल केली असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पांचाळ अधिक तपास करीत आहेत.
बस प्रवासात 1 लाख 82 हजारांची चोरी; बळीरामपुरमध्ये घरफोडले
