नांदेड(प्रतिनिधी)-मौजे बोधडी ता.किनवट येथे एका 59 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात लाकडी मुसळाने मारहाण करून त्याचा खून त्याच्याच मुलाने केल्याचा प्रकार घडला आहे.
सारीका अनंता सातलवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 डिसेंबरच्या दुपारी 1 ते 1.30 वाजेदरम्यान मौजे बोधडी (बु) त्यांच्या घरी दिपक मारोती सातलवाड (29) हा आला आणि त्याने आपले वडील मारोती गंगाराम सातलवाड यांच्यासोबत वाद घालून घरातील लाकडी मुसळ हातात घेवून त्याच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सोबतच सारीका सोडविण्यासाठी गेली असतांना तिच्या खांद्यावर मुसळ मारून तिलाही जखमी केले. किनवट पोलीसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) प्रमाणे वडीलांचा खून करणाऱ्या दिपक विरोधी गुन्हा क्रमांक 321/2025 दाखल केला असून पोलीस निरिक्षक गणेश कराड अधिक तपास करीत आहेत.
बापाच्या डोक्यात मुसळ मारून मुलाने केला खून
