महाराष्ट्र राज्याला सर्वोत्तम ए.आर.टी. केंद्र म्हणून सन्मान 

भारतात दुसरे तर महाराष्ट्रात प्रथम डॉ शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाच्या ए.आर.टी. केंद्राचे नाव देशपातळीवर

नांदेड – केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था (NACO) यांनी घेतलेल्या राष्ट्रीय स्तरावरील आढावा मोहिमेत महाराष्ट्राने उत्कृष्ट कामगिरी बजावत देशातील सर्वोत्तम राज्य म्हणून मान मिळवला आहे. सप्टेंबर २०२५ च्या अंतिम गुणपत्रिकेत ७५ पेक्षा अधिक गुणांची नोंद करणाऱ्या ‘ग्रीन झोन’मधील १६ केंद्रांपैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेडचे ए. आर.टी. केंद्र सर्वोत्कृष्ट केंद्र म्हणून निवडले जाऊन गौरविण्यात आले. मागील वर्षी २०२४-२५ मध्ये अंतिम गुणपत्रिकेत एकूण १४ इंडिकेटर मध्ये ए.आर.टी. केंद्र नांदेडचे गुण ३८ होते ते एका वर्षात वाढून ७५ झाले.

• वर्ष अखेरीस ए.आर.टी. घेणारे पीएलएचआयव्ही रुग्णांचे रिटेंशन चे प्रमाण १०० टक्के कायम ठेवण्यात केंद्र यशस्वी ठरले आहे.

• वर्षाच्या अखेरीस वायरल लोड सप्रेशन रेट ९७ टक्के ठेवण्यात यशस्वी ठरले आहे.

• गर्भवती महिलांचा वायरल लोड सप्रेशन रेट ९६ टक्के ठेवण्यात यशस्वी ठरले आहे.

हे यश ए.आर.टी. केंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यांचा परिश्रमाचे फलित असल्याचे मत महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केले. एचआयव्हीग्रस्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी व उपचार करून जे नावलौकिक ए.आर.टी. केंद्राने मिळवले आहे, याचा लाभ सर्व एचआयव्हीग्रस्त रुग्णांनी घ्यावा व आपले स्वास्थ्य व जीवन अधिक सदृढ करावे, असे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख यांनी केले आहे.अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, उपाधिष्ठाता व विभाग प्रमुख डॉ. शितल राठोड यांचे मार्गदर्शन आणि ए.आर.टी. केंद्राचे नोडल अधिकारी डॉ. मोहम्मद उबेदुल्ला खान यांचा सततचा पाठपुरावा वैद्यकीय अधिकार्यांचे औषधी व्यवस्थापन नियमित आणि निरंतर रुग्णसेवा देणारे डॉ. प्रदीप जाधव आणि त्यांच्या कर्मचाऱ्याच्या मेहनतीने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला.

दि. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून सन्मानित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप जाधव, श्रीमती अंबिका कुलकर्णी, प्रताप गायवाडे, मिलिंद सूर्यवंशी, अतिश बनसोडे, सतीश अचोले,प्रीतम कांबळे, दीपक कच्छवे, श्रीमती पूजा रोकडे, डॉ. फेरोज खान, आकाश निमडगे, गणेश उपासे व सर्व आय.सी.टी.सी. कर्मचारी श्रीमती सुनीता वावळे, अश्वजीत सूर्यवंशी आणि हर्षवर्धन पंडागळे यांचा समावेश होता.याप्रसंगी सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ संजय मोरे साहेब, वैद्यकीय अधीक्षक डॉ विजय कापसे साहेब, डॉ कपिल मोरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप अंकुशे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!