सेंट्रल झोन युवक महोत्सवात ११ पारितोषिकांसह सर्वसाधारण तृतीय विजेतेपद
नाट्य विभागात – जनरल चॅम्पियनशिप व नृत्य विभागाची द्वितीय जनरल चॅम्पियनशिप प्राप्त
छत्रपती संभाजी नगर –येथील एमजीएम विद्यापीठमध्ये असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी दिल्ली द्वारे आयोजित, ३९ व्या आंतर विद्यापीठ सेंट्रल झोन युवक महोत्सवात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने इतिहासात प्रथमच सर्वसाधारण तृतीय विजेतेपद पटकावून अभूतपूर्व यश संपादन केले.
महात्मा गांधी मिशन विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे २५ ते २९ नोव्हेंबर दरम्यान संपन्न झालेल्या या युवक महोत्सवात महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड अशा तीन राज्यातील विद्यापीठांचा सहभाग होता. यात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने एकूण ११ पारितोषिके मिळवून आपला दबदबा निर्माण केला. नांदेड येथून २४ नोव्हेंबर रोजी ‘स्वारातीम’ विद्यापीठाचा संघ कुलगुरू डॉ. मनोहर चासकर आणि प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली व विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजेश्वर दुडूकनाळे यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाला. विद्यार्थी कलावंत, प्रशिक्षक व व्यवस्थापक असा ६० जणांचा संघ साहित्य, नाट्य, संगीत, नृत्य व ललित कला अशा विविध प्रकारांत सहभाग नोंदवून युवक महोत्सवात ऐतिहासिक यश संपादन करून परतला.
यामध्ये आदिवासी दंडार नृत्यामध्ये लखन कनाके, प्रथमेश तोडसाम, संकेत जुगनाके, पीयूष तोडसाम, संदीप कोडापे, शुभम कोडापे, शिवम सुतार, सुनील खलुले, पुरुषोत्तम आत्राम, रितेश मडावी या विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर केले. लोकसंगीत या कलाप्रकारात अनंत खलुले, ऋषिकेश पांचाळ, गणेश कदम, मंगेश भालेराव, धीरजकुमार प्रधान, श्रीनिवास लंकावाढ, उदय जाधव, वैभव कदम, वैभव शेळके यांनी सर्व द्वितीय क्रमांक प्राप्त केला. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीने पहिल्यांदाच सुरू केलेल्या संकल्पना नृत्य या स्पर्धेमध्ये विद्यापीठाने द्वितीय क्रमांक प्राप्त करून इतिहास रचला यामध्ये प्रज्योत कांबळे, रामेश्वर आढाव, शिवम सुतार, सुनील खलुले, उदय जाधव, वैभव कदम, स्वाती खंदारे, श्रेयस कुलकर्णी, आदिती केंद्र, अंजली जाधव, आर्यन गिरवळकर, गजानन मिश्रा यांनी बाजी मारली. विडंबन मध्ये श्रेयस कुलकर्णी, आदिती केंद्रे, रामेश्वर आढाव, स्वाती खंदारे व आर्यन गिरवलकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. मुकाभिनय मध्ये अंजली जाधव, रामेश्वर आढाव, स्वाती खंदारे, शिवम सुतार, सुनील खलुले व प्रज्योत कांबळे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. शास्त्रीय सुरवाद्य या स्पर्धेत चिन्मय मठपती याने प्रथम क्रमांक पटकावला.
शास्त्रीय गायन मध्ये ईश्वरी जोशी, समूहगायन भारतीय मध्ये ईश्वरी जोशी, सोनू गवळी, माधवी मठपती, मीनाक्षी आडे, नेहा थोरात वैष्णवी गिरी यांनी तर शास्त्रीय तालवाद्य मध्ये ऋषिकेश पांचाळ, पोस्टर मेकिंग मध्ये ज्ञानेश्वर साठे, वादविवाद मध्ये गार्गी पस्तापुरे व ऐश्वर्या नांदेडकर यांनी पारितोषिके पटकावली.
या सर्व पारितोषिकांसह नाट्य विभाग – जनरल चॅम्पियनशिप, नृत्य विभाग – द्वितीय जनरल चॅम्पियनशिप प्राप्त करून सर्व विद्यार्थी कलावंतानी विद्यापीठाचा नावलौकिक देशात वाढवला. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच मुकाभिनय व विडंबन हे कलाप्रकार राष्ट्रीय महोत्सवासाठी पात्र ठरले आहेत.
विशेष बाब म्हणजे २४ वर्षांनंतर विद्यापीठाचे लोकनृत्य राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी पात्र झाले असून लोकसंगीत प्रकारही सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय महोत्सवासाठी निवडला गेला आहे. हे सर्व विद्यापीठासाठी अभिमानास्पद ठरले आहे.
संघ व्यवस्थापनाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी डॉ. संदीप काळे व प्रा. माधुरी पाटील यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
हे यश संपादन करण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे होते. यामध्ये दिलीप डोंबे व महेश घुंगरे (एकांकिक/मुकाभिनय/विडंबन/नक्कल/संकल्पना नृत्य), डॉ. शिवराज शिंदे (संगीत), संदेश हटकर व संकेत गाडेकर (आदिवासी नृत्य), किरण देशमुख (वक्तृत्व व वादविवाद) डॉ. पांडुरंग पांचाळ व समाधान राऊत (लोकसंगीत) यांनी अथक परिश्रम घेऊन सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या चमकदार कामगिरीमध्ये विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजेश्वर दुडुकनाळे यांचे नेतृत्व व प्रा. डॉ. संदीप काळे यांनी घेतलेले अथक परिश्रम महत्त्वपूर्ण ठरले.
या कामगिरीबद्दल कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, परीक्षा संचालक डॉ. हुशारसिंग साबळे, अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, वित्त व लेखाधिकारी डॉ. भालचंद्र पराग, क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांनी संघाचे अभिनंदन केले.
संघाच्या यशासाठी मधुकर आळशे व विद्यार्थी विभागातील कर्मचारी संभाजी कांबळे, बालाजी शिंदे, जीवन बारसे वाहन चालक बालाजी रोकडे, खयूम शेख, गजानन कराळे आदींनी परिश्रम घेतले.
