नांदेड(प्रतिनिधी)-मरखेल पोलीसांनी ऑनलाईन फसवणूक झालेले 94 हजार रुपये तक्रारदाराला परत मिळवून दिले. नांदेड पोलीसांनी जनतेला आवाहन केले आहे की, अशा फसवणूकीच्या संदर्भाने नागरीकांनी दक्ष राहावे.
मौजे टाकळी (ज) ता.देगलूर येथील महेश बळीराम दुमने यांचा किराणा व्यवसाय आहे. त्यांनी HI-BOX या ऍपवर गुंतवणुक केली तर 24 तासात 12 टक्के फायदा मिळतो ही जाहीरात पाहिली. त्यानुसार त्यांनी 1 हजार रुपये गुंतवणूक केली. 24 तासात त्यांना 120 रुपये फायदा झाला. त्यानंतर त्यांनी 94 हजार रुपयांची गुंतवणूक पण त्याचा फायदा आला नाही. तेंव्हा त्यांनी सायबर संकेतस्थळावर तक्रार नोंदवली. हा गुन्हा मरखेल पोलीसांकडे आला. तेथील सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि हुरडेकर आणि पोलीस उपनिरिक्षक विलास पवार यांनी HOLD/ LIEN या संदर्भाने बॅंकांना ईमेल करून महेश डुमने यांची 94 हजार रुपये रक्कम परत मिळवून दिली.
नांदेड पोलीसांनी जनतेला आवाहन केले आहे की, कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, अनोळखीAPK फाईल आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करू नये, आपल्या मोबाईलवर आलेला OTP, पासवर्ड कोणालाही देवू नये, सोशल मिडीयावर जास्त नफा देणाऱ्या जाहीरातींवर विश्र्वास ठेवू नये. आपली वैयक्तीक माहिती ऑनलाईन प्लॅटफॉमवर कोणालाही देवू नये. आपल्या सोशल मिडीया अकाऊंटला टुस्टेप व्हेरीपिकेशन ठेवावे, अनोळखी व्यक्तीचे व्हिडीओ कॉल घेवू नये. डिजिटल अरेस्ट हा प्रकार फ्रॉर्ड असून त्यास बळी पडू नये, आपल्याला ऑनलाईन फसवणूक झाली तर सायबर हेल्पलाईन 1930 या क्रमांकावर माहिती द्यावी आणि Cybercrime.gov.in या संकेतस्थळावर आपली तक्रा्रर नोंदवावी.
मरखेल पोलीसांनी ऑनलाईन फसवणूक झालेले 74 हजार रुपये परत मिळवून दिले
