नांदेड(प्रतिनिधी)-मुदखेड पोलीसांनी अपर पोलीस अधिक्षक यांचे वाचक पोलीस निरिक्षक यांच्यासह अवैध वाळू विरुध्द कार्यवाही करून 43 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भोकरच्या अपर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांचे वाचक पोलीस उपनिरिक्षक रामदास श्रीमंगले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते मुदखेडचे पोलीस निरिक्षक धिरज चव्हाण, अपर पोलीस अधिक्षक कार्यालयातील पोलीस अंमलदार पांडूरंग जिनेवाड आणि राजदिपसिंघ खालसा यांनी मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे शंखतिर्थ जवळ गोदावरी नदीपात्रात छापा मारला. ज्यात एक टिपर त्यात अडीच ब्रास वाळू होती. तीन रिकामे टिपर, एक पोकलेंड मशीन आणि दहा ब्रास साठवलेली वाळू असा एकूण 45 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सुरज गणेश अवातिरक रा.सिध्दनाथपुरी, कृपाकर तातेराव खानसोळे, माधव बालाजी उमाटे, सचिन खानसोळे रा.वासरी आणि इसाक खान नसीर खान पठाण रा.खाले तामसा या चौघांविरुध्द गुन्हा क्रमांक 213/2025 दाखल केला आहे.
अपर पोलीस अधिक्षक भोकर यांच्या पथकाने अवैध वाळूवर धाड टाकली
