पालकांनी बालकांना स्क्रीन उपलब्ध करून द्यावा परंतू तो मोठा असाव

नांदेड(प्रतिनिधी)-आजचा अल्फा पिढी विना स्क्रीनच्या राहु शकणार नाही याची जाणिव प्रत्येक पालकाला होणे आवश्यक आहे. काल-परवाच एक प्रकार आम्ही पाहिला त्यामध्ये एक 3-4 वर्षाच्या बालक एका सभागृहामध्ये मोबाईल घेवून आपल्या वडीलांपासून दुर एकटा बसून त्याचे निरिक्षण करत होता. या घटनेला आम्ही यासाठी मांडत आहोत की, पालकांनी यातून जागृत होण्याची गरज आहे.
काल-परवाच एका सभागृहामध्ये एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमात आपल्या मुलांना त्या विषयाची जाणिव व्हावी म्हणून बहुदा एका पालकाने आपल्या 3-4 वर्षाच्या बालकाला सोबत आणले होते. तो बालक काहीही केल तरी तो बालक कार्यक्रम पाहण्याच्या तयारीत नव्हता. तो आपल्या वडीलांना वारंवार मोबाईल मागत होता. त्याचा त्रास लक्षात घेवून वडीलांनी त्याला मोबाईल दिला. तो पर्यंत या कार्यक्रमात गर्दी पुर्णपणे जमलेली नव्हती. कार्यक्रम सुरु व्हायला वेळ होता. तो बालक मोबाईल घेवून अत्यंत दुरच्या रांगेतील खुर्चीवर जाऊन बसला आणि मोबाईल पाहत होता. त्याचे जगाकडे लक्षच नव्हते. कोण-त्याच्या जवळून येत आहे, कोण त्याला पाहत आहे. तो मस्त आपल्याच जगात जगत होता.
आमच्या लेखणीला त्रास आम्ही यासाठी दिला आहे की, वैद्यकीय व्यवसाय करणारे त्यातील नेत्र तज्ञ हे सांगतात की, आजच्या परिस्थितील ही अल्फा पिढी स्क्रीनशिवाय राहु शकणार नाही. उदाहरणार्थ मोबाईल, टी.व्ही. इत्यादी. त्यामुळे नेत्र तज्ञ सांगतात की, मोबाईलचा पडदा लहान असता म्हणून पालकांनी आपल्या बालकांना मोठा स्क्रीन उपलब्ध करून द्यावा आणि त्यावर त्याला काय पाहायचे आहे, काय खेळायचे आहे याची मुभा पण द्यावी. फक्त त्या स्क्रीनला काही संकेतस्थळांसाठी मात्र लॉक असला पाहिजे. त्या कार्यक्रमात हा छोटा बालक मोबाईल पाहत होता. परंतू ही बाब या बालकाच्या डोळ्यांवर परिणाम करणारी आहे. म्हणून पालकांनी आपल्या बालकांना स्क्रीन उपलब्ध करून द्यावा परंतू तो मोठा असावा एवढ्यासाठी आमची ही मेहनत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!