नांदेड (प्रतिनिधी)- मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये 26/11 रोजी झालेल्या हल्ल्यात अनेक जवान शहिद झाले. त्यांना अभिवादन करण्यासाठी सिद्धांत सुरनर मित्र मंडळाच्यावतीने श्रीनगर येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सिद्धांत सुरनर मित्रमंडळाच्यावतीने सामाजिक बांधिलकी जोपासत विविध उपक्रम राबविले जातात. त्या अनुषंगाने 26/11 तील शहिद जवानांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रीनगर येथे मित्रमंडळाच्यावतीने रक्तदान शिबीर राबविण्यात आले. या शिबिरात अनेक युवकांनी रक्तदान करून शहिद जवानांना अभिवादन केले.
रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी आकाश सुरनगर, सुमेध मांजरमकर, अभिजीत मोहिते, दिपेश मोरे, श्रीनिवास मोरे, वेदांत कल्याणकर, समर्थ अडकिणे, प्रणव कदम, नागेश जाधव, कन्हैया कदम, नंदकिशोर कदम, सिद्धांत पत्रे, अजय कोकरे, तेजस सुर्यवंशी, पुरूषोत्तम दिवे आदींनी प्रयत्न केले.
रक्तदान शिबीरातून 26/11 च्या हल्ल्यातील शहिद जवानांना अभिवादन
