रामतीर्थ,(प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलीस दलात आज लुचपत प्रतिबंधक विभागाने दोन गुन्हे दाखल केले आहेत. दुसऱ्या गुन्ह्यातील पोलीस आरोपीने लाच स्वीकारली नाही. कारण तो हुशार होता त्याने या अगोदर स्थानिक गुना शाखेत काम केले होते. परंतु रामतीर्थच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर त्याच्या एका सहकारी खाजगी व्यक्तीसह लाच मागणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागात साई प्रकाश चन्ना हे पोलीस निरीक्षक कार्यरत आहेत. त्यांनी दिलेला तक्रारीनुसार 22 नोव्हेंबर रोजी त्यांच्याकडे एका तक्रारदाराने तक्रार दिली की 21 नोव्हेंबर रोजी तक्रारदार हा पत्ते खेळत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ जांभळीकर यांना सापडला त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी रामतीर्थ पोलीस ठाण्यात जुगार कायद्याने गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ जांभळीकर यांनी सदर गुन्ह्या मध्ये पीसीआर न घेता तपासात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तसेच खाजगी व्यक्ती अमजद पठाण याने तक्रारदाराला फोनवर सांगितले की मला 30000 रुपये दिले असते तर तुमचे सर्व गुन्हे मी अंगावर घेतले असते.मी जांभळीकर साहेबांना सांगतो तक्रारदार येत आहे, त्यांना पैसे देऊन टाका असे म्हणून लाच देण्यास प्रोत्साहन दिले. दिनांक 22 नोव्हेंबर रोजी या लाच मागणीची पडताळणी झाली या गुन्हामध्ये पोलीस कोठडी न घेता तपासात मदत करण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ खंडेराव जांभळीकर यांनी तक्रारदाराकडे शासकीय पंचांस समक्ष दहा हजार रुपये लाचेची स्वतः मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्यास सहमती दिली. तसेच खाजगी माणूस अमजद पठान यांनी तक्रारदार याचा फोनवर जांभळीकर यांना लाच देण्याकरता प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.
या संदर्भाने दिनांक 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी सापळा रचण्यात आला.परंतु दशरथ जांभळीकर हे पूर्वी स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत असल्यामुळे त्यांना तक्रारीची शंका आली आणि त्यांनी लाच स्वीकारली नाही. आरोपींच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.वृत्त लिही पर्यंत रामतीर्थ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार दशरथ खंडेराव जांभळीकर या सहाय्यक पोलीस उप निरीक्षकासह शंकर नगर येथील अमजद पठाण या खाजगी व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या कामात पोलीस उपाधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनात साई प्रकाश चन्ना आणि पोलीस अंमलदार संतोष वच्चेवार,प्रकाश मामूलवार,ईश्वर जाधव,श्याम गोरपल्ले काम केले.या गुन्ह्याचा तपास अनिता दिनकर या करणार आहेत दशरथ जांभळीकर आणि खाजगी माणूस अमजद पठाण याला अटक करण्यात आलेली नाही. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया समजतात सहाय्यक पोलीस उप निरीक्षक दशरथ खंडेराव जांभळीकर फरार झाले आहेत.

