नांदेड- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नांदेड जिल्हा काँग्रेस कमेटी (उत्तर) च्या कार्यकारणीला मान्यता दिली असून प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ऍड. गणेश पाटील यांनी नवीन कार्यकारणी घोषीत केली आहे. नांदेड जिल्हा काँग्रेस कमेटी (उत्तर) च्या जिल्हा कार्य अध्यक्षपदी पक्षातील माजी नगरसेवक मुन्तजीबोद्दीन यांची नियुक्ती करण्यात आली. मुन्तजीबोद्दीन गेल्या 14 वर्षापासुन नांदेड काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता म्हणून काम पाहात आहेत. या नियुक्तीबद्दल मुन्तजीबोद्दीन यांनी नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रा. रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष (उत्तर) राजेश पावडे, नांदेड महानगर अध्यक्ष अब्दुल सत्तार यांचे आभार मानले आहे. Kanthak Suryatal Post Views: 710 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ जांभळीकर लाचलुचपतची चाहूल लागताच फरार पोलीस जीवनात खेळांचे महत्व अपरंपार-शहाजी उमाप