नांदेड(प्रतिनिधी)-न्यायालयात एका खून प्रकरणातील आरोपी सोबत बोलत असतांना त्याचे छायाचित्रीकरण, व्हिडीओचित्रीकरण करतांना पोलीसांनी त्याला रोखले असता त्या युवकाने पोलीसांसोबत बेशिस्त वर्तन केले. या संदर्भाने वजिराबाद पोलीसांनी त्या युवकाविरुध्द अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. गोंधळ घालणारा युवक विधीशाखेचा विद्यार्थी आहे असे सांगण्यात आले.
आज सकाळी न्यायालय परिसरातील पहिल्या मजल्यावर अतिरिक्त सत्र न्यायालय येथे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका दुहेरी खून प्रकरणातील आरोपी मोहम्मद मोहियोद्दीन फारूखी यांना न्यायालयात तारेखवर आणले असतांना त्यांचा मुलगा मोहम्मद उमर त्यांना भेटायला आला. तो आपल्या वडिलांशी बोलत होता. पण नंतर त्याने वडिलांचे फोटोग्राफ आणि व्हिडीओ शुटींग केले. यावर पोलीसांनी आक्षेप उचलला. तेंव्हा त्याने पोलीसांसोबत बेशिस्त वर्तन करत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून शांततेचा भंग केला. या संदर्भाची तक्रार पोलीस अंमलदार एस.एन.बनसोडे यांनी दिल्यानंतर वजिराबाद पोलीसांनी मोहम्मद उमर मोहम्मद मोहियोद्दीन विरुध्द मुंबई पोलीस कायदा कलम 110/117 प्रमाणे अदखल पात्र गुन्हा क्रमांक 611/2025 दाखल केला आहे. हा घटनाक्रम न्यायालय परिसरात घडला तेंव्हा न्यायालय परिसरात गोंधळ माजला होता. परंतू उपस्थितीत पोलीसांनी परिस्थिती नियंत्रणा आणली. वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर चव्हाण यांनी विधीशाखेचा विद्यार्थी असलेल्या मोहम्मद उमरला भविष्यातील जीवनाच्या संदर्भाने उत्कृष्ट समज दिली.
संबंधीत व्हिडीओ…
न्यायालय परिसरात आरोपीच्या नातलगाचा पोलीसांसोबत वाद
