अडचणीतल्या महिलांसाठी हक्काचा शासकीय आधार 

नांदेड – महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत नांदेड शहरात माता अनुसया शासकिय महिला वसतिगृह (राज्यगृह) ही शासकीय संस्था अनाथनिराधारनिराश्रीत व अडचणीतल्या महिलांसाठी कार्यरत आहे. येथे 18 ते 60 वर्षांपर्यंत निवाऱ्याची आवश्यकता असणाऱ्या निराधारविधवाकुमारी मातापरित्यक्ताआत्याचारीत महिलांसाठी विनाशुल्क अन्नवस्त्रनिवारासमुपदेशन व पुर्नवसनाची व्यवस्था केली जाते. त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते.

येथे आवश्यकतेनुसार कायदेशीर सल्ला व मदत दिली जातेतसेच नियमित आरोग्य तपासणी केली जाते. 18 वर्षापुढील महिलांना मानसिक, सामाजिकआर्थिकशैक्षणिक दृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी तसेच पुनर्वसनाच्यादृष्टिने त्यांच्या विवाहाकरीता संस्थेत सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. येथे शिक्षण व प्रशिक्षण घेत असलेल्या महिलांना आवश्यकतेनुसार प्रवेश दिला जातो. समस्याग्रस्त 18 वर्षापुढील महिलांनी संकटकाळी चुकीच्या मार्गानी न जाता समस्येचे निराकरण होईपर्यंत अल्प कालावधीसाठी या संस्थेत दाखल होण्याच्या फायदा घ्यावा. प्रवेशासाठी फोटोसह ओळखपत्र आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कामकाजाच्या दिवशी दुपारी ते यावेळेत अधीक्षक माता अनुसया शासकिय महिला वसतिगृह (राज्यगृह)हॉटेल भाईजी पॅलेसच्या पाठीमागे शिवाजीनगर उड्डाणपुल परिसर शिवाजीनगर नांदेड येथे किंवा दुरध्वनी क्रमांक 02462-233044 संपर्क साधावाअसे आवाहन नांदेड येथील शासकीय महिला राज्यगृह अधीक्षक अ.सा.ठकरोड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!