*कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला डिजिटल चालना*
नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास आणि संशोधन केंद्र, किनवट येथे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या पुढाकाराने आणि विशेष प्रयत्नांमुळे केंद्रात तब्बल ८६ इंच क्षमतेचे अत्याधुनिक ‘स्मार्ट बोर्ड पॅनेल’
तसेच साउंड सिस्टीम बसविण्यात आलेली आहे.
डॉ. चासकर यांच्या दूरदृष्टीपूर्ण निर्णयामुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून अत्याधुनिक, आकर्षक आणि प्रभावी शिक्षण घेणे शक्य होणार आहे. या उपक्रमाबद्दल केंद्रातील कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी कुलगुरू महोदयांचे मनपूर्वक आभार मानले आहेत.या उपक्रमामुळे आदिवासी भागतील विदयार्थ्यांना बराच फायदा होणार आहे. यामुळे त्यांना आधुनिक शिक्षणाची संधी मिळणार आहे. स्मार्ट बोर्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना धडे अधिक प्रभावी, समृद्ध आणि दृकश्राव्य पद्धतीने समजण्यास मदत होणार आहे. या मुळे डिजिटल साक्षरतेला चालना मिळणार आहे. या सुविधेमुळे आदिवासी भागातील मुलांना तंत्रज्ञानाशी जवळीक निर्माण होऊन डिजिटल साक्षरता वाढीस लागेल. समान संधी मिळेल आणि उज्ज्वल भविष्य घडेल. शहरी विद्यार्थ्यांप्रमाणेच उच्च दर्जाचे शिक्षण घेण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळून त्यांच्या भविष्यास नवी दिशा प्राप्त होईल.
या उपक्रमाद्वारे विद्यापीठ प्रशासनाची सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली आहे. केंद्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, प्र-कुलसचिव डॉ. डी. डी. पवार तसेच विद्यापीठाचे विविध अधिष्ठाता यांचे मार्गदर्शन व सहकार्य मोलाचे ठरले आहे.
केंद्राचे समन्वयक डॉ. मार्तंड कुलकर्णी यांनी सांगितले की, “या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे केंद्रातील विद्यार्थी स्पर्धेच्या
युगात सक्षमपणे पुढे जातील.”सह-समन्वयक डॉ. सुनील व्यवहारे, डॉ. एस. आर.शिंदे तसेच सहायक प्राध्यापक डॉ. नितीन गायकवाड, डॉ. योगेश अंबुलगेकर,डॉ. प्रवीण खंडागळे, डॉ. प्रमोद राठोड,प्रा. प्रीती देवस्थळे, प्रा. चेतन जाधव,प्रा. पवार, प्रा. श्रीकांत दुधारे यांनी या उपक्रमात योगदान दिले. तसेच कर्मचारी विठ्ठल हंबर्डे व रमेश जाकुलवार यांनीही विशेष मेहनत घेतली आहे. हा डिजिटल उपक्रम निश्चितच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नवे युग उघडणारा ठरणार आहे.
