नांदेड- उमरी शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा २००३ कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने आज रोजी उमरी शहरात विविध ठिकाणी अचानक धाडी टाकून एकूण 20 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही केली. या कार्यवाहीत 9 हजार 200 रुपये दंड आकारण्यात आला. ही कार्यवाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशाखाली व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय पेरके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे व नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. शितल चातुरे, डॉ. संजीवनी जाधव, डॉ. पूजा भाकरे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड व एमजीवीएसचे मंगेश गायकवाड तसेच उमरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुठे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन आरमाळ, महिला पोलीस कॉन्सटेबल आम्रपाली कांबळे व जयश्री शेळके उपस्थित होते. सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी केले आहे.
More Related Articles
कंधारमध्ये 27 जुगारी पकडून 7 लाख 64 हजारांचा मुद्देमाल जप्त
नांदेड (प्रतिनिधी)-नळगे गल्ली कंधार येथे एका दार नसलेल्या घरात छापा मारुन पोलीसांनी 27 जुगाऱ्यांना पकडले…
अवैध वाळू वाहतुक करणारा टिपर अर्धापूर पोलीसांनी पकडला
नांदेड(प्रतिनिधी)-अवैध वाळू वाहतुक करणारा एक टिपर पकडून अर्धापूर पोलीसांनी दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला…
उमेदवारानेच प्रसिध्दी मिळविण्यासाठी आपलीच गाडी जाळली
नांदेड(प्रतिनिधी)-सेवादासनगर तांडा ता. मुखेड येथे काही गाड्यांना आग लावणाऱ्या दोन जणांना मुखेड पोलीसांनी त्वरीत जेरबंद…
