नांदेड– ऊस तोडणी मजूर व मुकादम व वाहतूक कंत्राटदार यांचेकडून ऊस तोडणीसाठी रोख पैशाची व अन्य वस्तू व सेवा यांची मागणी होत असल्यास शेतकऱ्यांनी तक्रार निवारण अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी. संबंधित तक्रार निवारण अधिकारी यांनी तक्रारीचे निराकरण न केल्यास, कार्यालयाच्या ई-मेल rjdsnanded@rediffmail. com वर तक्रार करावी किंवा 02462-254156 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन प्रादेशिक सहसंचालक (साखर) विश्वास देशमुख यांनी केले आहे.
राज्यात 2025-26 गाळप हंगामात उपलब्ध असलेला सर्व ऊस सर्वसाधारणपणे 145-150 दिवसात गाळपा होईल एवढी साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढली आहे. शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळप होईल की नाही याबाबत शंका घेऊन ऊस लवकर गाळपास जावा यासाठी अनुचित मार्गाचा अवलंब करुन नये. ऊस पिक चांगले नाही, खराब आहे, ऊस पडलेला आहे, ऊस क्षेत्र अडचणीचे आहे, तोडणी करणे परवडत नाही अशी विविध कारणे सांगून शेतकऱ्यांकडून रोख पैशाची व अन्य वस्तू व सेवा यांची मागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांनी याबाबत काही तक्रारी असल्यास कारखान्याच्या तक्रार निवारण अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
तक्रार अधिकाऱ्यांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक*
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना लि. यु-1, लक्ष्मीनगर ता. अर्धापूर साठी आर.टी.हरकळ-8378990760, सुभाष शुगर प्रा.ली. हडसनी ता. हदगाव के.बी. वानखेडे-9423436621, एम.व्ही.के.ॲग्रो फुडस प्रॉडक्टस लि. वाघलवाडा, उमरी ता. नांदेड एम.जी.गाडेगांवकर-9850641709, कुंटूरकर शुगर अँन्ड अँग्रो प्रा.ली. कुंटूर ता. नायगाव साठी एस. देशमुख- 9423508437, ट्वेन्टीवन शुगर लि. यु-3 शिवणी, ता. लोहा साठी एस.ए. पंतगे- 7030908528, शिवाजी सर्व्हीस स्टेशन, मांजरी, बाऱ्हाळी ता. मुखेडसाठी एस.जी.माळेगावे-9359164988 याप्रमाणे तक्रार निवारण अधिकाऱ्यांची नावे व संपर्क क्रमांक आहेत .शेतकऱ्यांनी ऊस तोडणीबाबत काही तक्रारी असल्यास यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
