
काही भिकारचोट पत्रकार, लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी केलेल्या एका ट्विटनंतर “लालू यादवांच्या घरी भांडण” अशा बातम्या पसरवत आहेत. काही भाजप नेतेही या “भांडणाची” चटकारे घेत मजा करत आहेत. या सगळ्यात उत्कृष्ट प्रगल्भता दाखवणारा नेता मात्र चिराग पासवान ठरला. तो म्हणाला, “आमच्या घरातही अशाच परिस्थिती तयार झाली होती. त्यामुळे लालू यादवांच्या घरात काय घडले यावर मला काही बोलायचे नाही. अशा परिस्थितीतून जाताना कुटुंबाची काय अवस्था होते ते मला माहीत आहे.”यावर काही ‘विकास’ पत्रकार “रोहिणीवर चप्पल कोणी फेकली?”, “कि ती चप्पल तेजस्वी यादवने फेकली?” अशा हास्यास्पद हेडलाईन्स देत आहेत, आणि अशीच खोटी उत्तरेही देत आहेत. या बातम्या सत्ताधाऱ्यांनीच प्लांट केल्याचे स्पष्ट आहे आणि तथाकथित ‘देश चालवणारे पत्रकार’ त्या दाखवत आहेत. हीच भारतीय लोकशाहीची शोकांतिका आणि आजच्या भारतीय पत्रकारितेची पातळी आहे.घरगुती भांडणाचे वृत्तांकन म्हणजे आरजेडीला बिहारमधून पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न आहे, हा त्यामागचा कल आहे. तुम्ही मध्यप्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा जिंकलेत. आता पुढे पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, केरळच्या निवडणुका आहेत. त्याकडे लक्ष देण्याऐवजी काँग्रेस फुटेल याचीच चर्चा का?
वाचकांसमोर आम्हाला मांडायचे आहे की निवडणूक आयोगाच्या मदतीने निवडणुका जिंकण्याची जी पद्धत दिसत आहे, ती पुढे देशात “एक देश, एक निवडणूक, एक नियम” हे धोरण राबवण्याची तयारी वाटते. एसआयआर करून निवडणूक आयोगाने जी नावे वगळली, त्यातील बहुतांश नावे विरोधी पक्षांच्या मतदारांची होती, आणि निवडणुकीत भाजप उमेदवारांचे विजयाचे अंतर अत्यंत नगण्य दिसते.निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार बिहारमध्ये निवडणुकीपूर्वी जितके मतदार होते, मतमोजणीच्या यादीत त्यापेक्षा तीन लाख जास्त मतदार निघाले. हे मतदार कुठून आले? त्यांना मतदान कसे करता आले? आयोगाकडे या प्रश्नांची कोणतीही उत्तरे नाहीत.

इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणते की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मतचोरी करून एनडीएला 200+ जागांचा निकाल मिळवून दिला आणि याचे आठ पुरावे काँग्रेसने सादर केले आहेत. बिहारमध्ये एकूण 70 लाख मतदार कमी झाले आणि 21 लाख मतदार नवीन जोडले गेले. हे एसआयआर नंतरचे आकडे. ज्यांची नावे वगळली गेली ते बहुतांश विरोधी पक्षांचे मतदार होते.देशातील बरेच भाजप नेते व कार्यकर्ते बिहारव्यतिरिक्त इतर राज्यांत मतदान करतानाचे तसेच बिहारमध्ये मतदान केल्याचे फोटो उपलब्ध आहेत. ते दोनदा मतदान कसे करू शकले? त्यांच्या नावांचा समावेश बिहारच्या मतदारयादीत कसा झाला?निवडणुकीदरम्यान केंद्र सरकारने इतर राज्यांतून विशेष रेल्वेगाड्या चालवून भाजप कार्यकर्त्यांना बिहारमध्ये मतदानासाठी आणले, असे व्हिडिओ उपलब्ध आहेत.ऑक्टोबर 2025 मध्ये निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी बिहारमध्ये 7 कोटी 4 लाख 26 हजार मतदार असल्याचे सांगितले. परंतु मोजणीनंतरची संख्या 7 कोटी 45 लाख 26 हजार 858 कशी झाली? हे तीन लाख मतदार कुठून वाढले? आयोग शांत.द रिपोर्टर कलेक्टिव्हने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार मतदारयादीत 14.35 लाख डुप्लिकेट मतदार आहेत. एसआयआर असूनही बोगस मतदार पकडण्यासाठी आयोगाने कोणतेही सॉफ्टवेअर वापरले नाही.एनडीए खासदार शांभवी चौधरी मतदानानंतर बाहेर आल्या तेव्हा त्यांच्या दोन्ही हातांवरील बोटांवर मतदानाची शाई दिसत होती. म्हणजेच दोनदा मतदान.आचारसंहिता लागू असतानाही मोदी सरकारने बिहारमधील महिलांना 10,000 रुपये देणे चालूच ठेवले.मोदी–शहा यांच्या सांगण्यावरूनच निवडणूक आयोगाने ही निवडणूक “चोरली”, असा आरोप काँग्रेसने केला आहे. पुढे हा प्रकार पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, केरळ, तामिळनाडूतही घडवण्याचा प्रयत्न होईल.‘जनसत्ता’ने “बिहार हल्ल्यानंतर काँग्रेस फुटणार” अशी बातमी दिली, जी प्रत्यक्षात मोदींनी केलेल्या भाषणावर आधारित आहे. कुठल्याही काँग्रेस नेत्याने राहुल गांधींना असा प्रश्न विचारल्याचा उल्लेख नाही.
महाराष्ट्रात त्यांनी शिवसेना फोडली, हरियाणा–बिहारमध्ये समाजांना एकमेकांविरुद्ध उभे केले, बिहारमध्ये तेजस्वी यादवला टार्गेट केले. नेमका काय धंदा सुरू आहे ते देव जाणे. पण असे दिसते की देशात “एकच निवडणूक आणि एकच नियम” लागू करण्यासाठी सर्व राज्यांत सत्ता मिळवण्याचा हा मोठा राजकीय डाव आहे.काँग्रेस नेते निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यांवर बोलत आहेत, मग मोदींना काँग्रेसच्या विभाजनाची इतकी चिंता का? ते गांधी परिवारासोबत माइंड गेम खेळत आहेत काय?
२०१४ मध्ये काँग्रेसनेच भाजपला 240 जागांवर नेले. प्रत्यक्ष त्यांची संख्या 180 च्या आसपास होती, पण सात टप्प्यांत मतदानात नंतरच्या टप्प्यांत खेळ झाला व ते 240 झाले. तरीही ते “कुबड्या घेऊन सरकार” चालवत आहेत.काँग्रेसने संविधान वाचवण्यासाठी इंडिया महागठबंधन उभारले, पण भिकारी पत्रकारांनी त्याला “इंडी बंधन” असे नाव देऊन खिल्ली उडवली, ही पत्रकारितेची खालची पातळी.
महाराष्ट्रात जसा पॅटर्न राबवला, राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडली तसाच पॅटर्न बिहारमध्ये आरजेडीवर राबवला जात आहे. तेजस्वी यादव यांनी जिंकलेल्या 35 आमदारांना तेजप्रताप यादव यांच्या हातात देण्याचा डाव सुरू आहे, जेणेकरून आरजेडीदेखील संपून जाईल.
एसआयआरमध्ये कापलेल्या नावांमुळेच 128 जागांचे निकाल तुटपुंज्या फरकाने ठरले. याचा अर्थ बिहारमध्ये भाजपची वास्तविक ताकद 74 जागांपर्यंतच आहे. मतदारयादीमध्ये एकही घुसखोर सापडला नाही, मात्र 70 लाख मतदार कमी कसे झाले याचे उत्तर नाही.मोदींना राहुल गांधींची भीती यासाठी आहे की, जर राहुल गांधींनी निवडणूक आयोगाविरुद्ध देशव्यापी आंदोलन उभे केले तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. म्हणून मोदी आपल्या भाषणात “काँग्रेस फुटेल” अशा खोट्या अफवा पसरवत आहेत.
मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेस हा “वामपंथी–मुस्लिम पक्षांचा प्रमुख” असल्याचे म्हणत नवीन अफवा पसरवली. वामन, डावे आणि मुसलमान समाजाला टार्गेट करून बोलणे पंतप्रधानांना शोभते काय?काँग्रेसमध्ये भाजपचे अनेक स्लीपर सेल आहेत; भविष्यात हे लोक गोंधळ घालणारी विधाने करतील. पण आज राहुल गांधी त्यांच्यावर कारवाई करू शकत नाहीत, कारण तसे केले तर मोदी म्हणतील, “पाहा, मी सांगितलेच होते, काँग्रेस फुटत आहे!”आता काँग्रेसने नव्या जोमाने, नव्या ताकदीने नवे आंदोलन उभारण्याची गरज आहे.
