*नामनिर्देशनपत्राची आज होणार छाननी*
नांदेड– जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व एका नगरपंचायतींच्या सन 2025 मधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्यासाठी सोमवार 10 नोव्हेंबर 2025 पासून सुरुवात करण्यात आली होती. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत नांदेड जिल्ह्यात अध्यक्ष पदासाठी एकुण 212 तर सदस्य पदासाठी 2 हजार 153 नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात आली आहेत.
नामनिर्देशनपत्रांची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी आज 18 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी 21 नोव्हेंबर 2025 पर्यंत तर अपील असलेल्या ठिकाणी 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी 26 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिध्द होईल, अशी माहिती नगरपालिका प्रशासन जिल्हा सहआयुक्त गंगाधर इरलोड यांनी दिली आहे.
नांदेड जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत निहाय सोमवार 10 ते 17 नोव्हेंबर 2025 रोजी शेवटच्या दिनांकापर्यंत एकुण नामनिर्देशनपत्राची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
*कुंडलवाडी नगरपरिषद*
अध्यक्षपदासाठी एकुण 10 तर सदस्यपदासाठी एकुण 155 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
*किनवट नगरपरिषद*
अध्यक्षपदासाठी एकुण 28 तर सदस्यपदासाठी एकुण 267 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
*लोहा नगरपरिषद*
अध्यक्षपदासाठी एकुण 5 तर सदस्यपदासाठी एकुण 106 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
*हदगाव नगरपरिषद*
अध्यक्षपदासाठी एकुण 21 तर सदस्यपदासाठी एकुण 182 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
*उमरी नगरपरिषद*
अध्यक्षपदासाठी एकुण 7 तर सदस्यपदासाठी एकुण 104 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
*भोकर नगरपरिषद*
अध्यक्षपदासाठी एकुण 32 तर सदस्यपदासाठी एकुण 208 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
*मुखेड नगरपरिषद*
अध्यक्षपदासाठी एकुण 12 तर सदस्यपदासाठी एकुण 122 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
*हिमायतनगर नगरपंचायत*
अध्यक्षपदासाठी एकुण 21 तर सदस्यपदासाठी एकुण 189 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
*धर्माबाद नगरपरिषद*
अध्यक्षपदासाठी एकुण 15 तर सदस्यपदासाठी एकुण 160 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
*कंधार नगरपरिषद*
अध्यक्षपदासाठी एकुण 8 तर सदस्यपदासाठी एकुण 120 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
*मुदखेड नगरपरिषद*
अध्यक्षपदासाठी एकुण 21 तर सदस्यपदासाठी एकुण 206 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
*देगलूर नगरपरिषद*
अध्यक्षपदासाठी एकुण 11 तर सदस्यपदासाठी एकुण 189 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
*बिलोली नगरपरिषद*
अध्यक्षपदासाठी एकुण 21 तर सदस्यपदासाठी एकुण 145 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
