नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड पोलीसांनी एका टॅम्पोमध्ये दाटीवाटीने कोंबुन तीन गोवंश जनावरे पकडली आहेत. 65 हजारांचे गोवंश आणि 7लाख रुपयांचा टेम्पो असा 7 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस उपअधिक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनात सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक वैशाली कांबळे, पोलीस अंमलदार केशव मुंडकर, विश्र्वनाथ हंबर्डे, रमेशश वाघमारे आणि विजय सुर्यवंशी यांनी 13 नोव्हेंबर रोजी रात्री 9.40 वाजेच्यासुमारास गस्त करत असतांना सोनखेड जवळील कलंबर फाटा येथे त्यासंनी टेम्पो क्रमांक एम.एच.48 सीबी 3404 ची तपासणी केली. त्यामध्ये तीन गोवंश दाटी-वाटीने कोंबून भरलेले होते. या प्रकरणी वैशाली कांबळे या ंच्या तक्रारीवरुन सय्यद मुबशीर रशीद (31) रा.मुल्लागल्ली पालम याच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 265/2025 दाखल केला आहे.
सोनखेड पोलीसांनी गोवंश पकडले
