नांदेड(प्रतिनिधी)-गोदावरी अर्बन मल्टी स्टेट के्रडीट को.ऑप सोसायटी यांच्याकडून घेतलेले कर्ज परतफेड करतांना धनादेशाचा अनादर झाला. या संदर्भाने चाललेल्या खटल्यात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.आर.कायस्ते यांनी धनादेश देणाऱ्या व्यक्तीला 1 लाख 10 हजार रुपये दंड आणि 6 महिन्याचा तुरूंगवास अशी शिक्षा ठोठावली आहे.
मौजे तळणी ता.जि.नांदेड येथील गोविंद गंगाराम सुर्यवंशी यांनी सोसायटीकडून व्यक्तीक कर्ज घेतले होते. कर्ज परतफेड करण्यासाठी गोविंद सुर्यवंशी यांनी धनादेश दिला होता. पण त्यांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो धनादेश अनादरीत झाला. या संदर्भाने सोसायटीचे शाखा व्यवस्थापक अविनाश बोचरे यांनी परक्राम्य संकीर्ण अभिलेख (एनआय ऍक्ट) च्या कलम 138 नुसार न्यायालयात प्रकरण सादर केले. या प्रकरणात आलेल्या सक्षी पुराव्याच्या आधारावर गोविंद गंगाराम सुर्यवंशी यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली. सोसायटीच्यावतीने ऍड. ए.पी.कुर्तडीकर यांनी काम केले तर व्यवस्थापक पंकज इंदुरकर यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला.
धनादेश अनादर प्रकरणी 1 लाख 10 हजार रुपये दंड
