नांदेड- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणजे १४ नोव्हेंबर बालदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. बालदिनाचे औचित्य साधून लोहा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पेनूर हायस्कूलमध्ये शालेय बालकविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या या कविसंमेलनात येथील बालकवी पंडित पाटील बेरळीकर, ज्येष्ठ कवी गजानन हिंगमिरे, सुप्रसिद्ध कादंबरीकार अशोक कुबडे, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, ज्येष्ठ कवयित्री उषाताई ठाकूर, प्रथितयश लेखिका रुपाली वागरे वैद्य आदी साहित्यिक कवी कवयित्री तसेच शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थींनी सहभागी होणार आहेत. या कविसंमेलनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन प्रशालेच्या वतीने करण्यात आले आहे.
More Related Articles
Front-end Developer in Canada Available jobs
Whether you have zero coding knowledge, are self-taught, or are somewhere in between, this course…
ऍड.मनप्रितसिंघ ग्रंथी यांना पितृशोक
नांदेड(प्रतिनिधी)-नंदीग्राम सोसायटी येथील ज्येष्ठ नागरीक सरदार अजितसिंघ गुरमुखसिंघ ग्रंथी(65) यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर अंतिमसंस्कार…
परस्पर विरोधी खून प्रकरणांमध्ये 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा
नांदेड(प्रतिनिधी)-उमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दुहेरी खून प्रकरणात 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. 2019…
