हवाई सुरक्षेला धोका? दिल्ली आकाशात जीपीएस सिग्नल स्पूफिंगचा मोठा प्रकार

उत्तर-पश्चिम दिल्ली परिसरातून आलेल्या सिग्नलवर संशय

दहा नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये झालेल्या कार अपघातात काही जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. मात्र, या घटनेच्या काही दिवस आधी म्हणजे सात आणि आठ नोव्हेंबर दरम्यान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अतिशय गंभीर स्वरूपाचा सायबर हल्ला झाला होता. या हल्ल्यामुळे शेकडो विमाने अपघातग्रस्त होण्याची शक्यता होती; अनेक विमाने एकमेकांना धडकू शकली असती. यामुळे किती लोकांचा जीव गेला असता आणि किती जखमी झाले असते, याची कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे. आर्थिक नुकसान तर वेगळेच, पण भारतात एकाच व्यक्तीचा जीव जाणे सुद्धा अतिशय दुर्दैवी मानले जाते. येथे एखादी मुंगी मारणेही वाईट समजले जाते. मग माणसांचा मृत्यू हा देशासाठी किती वेदनादायक असेल, हे समजणे आवश्यक आहे.जर हा सायबर हल्ला यशस्वी झाला असता, तर तो भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा एव्हिएशन टेररिझम (Aviation Terrorism) प्रकार ठरला असता.

 

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित ढोबळ यांनी सांगितले होते की 2014 नंतर भारतात कोणताही मोठा अतिरेकी हल्ला झाला नाही, पण प्रत्यक्षात असे हल्ले होतच आहेत. एकेकाळी त्यांनी पाकिस्तानमध्ये सात वर्षे गुप्तचर म्हणून काम करून मौल्यवान माहिती भारताला पुरवली होती. मात्र, सुरक्षा सल्लागार बनल्यानंतर त्यांच्या कामगिरीची किंमत हळूहळू कमी झाली.त्या सात आणि आठ नोव्हेंबरच्या रात्री, सुमारे 200 हून अधिक विमाने हवेत होती. काही विमानांना इतर विमानतळांकडे वळवण्यात आले, काहींना उशीर झाला, आणि दिल्लीच्या आकाशात एकूणच गोंधळ माजला. पायलटांना “हवेतच राहा, खाली उतरू नका” असे आदेश देण्यात आले.

 

या घटनेचे मूळ कारण म्हणजे GPS सिग्नल स्पूफिंग (GPS Signal Spoofing) — म्हणजेच जीपीएस प्रणालीला खोटे सिग्नल देऊन विमानांना चुकीचा मार्ग दाखवला गेला. गाड्या चालवताना आपण Google Maps वापरतो, जो कधी कधी चुकीचा रस्ता दाखवतो, पण विमानातील पायलटला तशी चौकशी करण्याची संधी नसते. पायलट फक्त सिग्नलवर अवलंबून असतो.त्या दिवशी जीपीएस सिस्टीम विमानांना चुकीची माहिती देत होती. पायलट दिल्लीला उतरतो आहे असे समजत असताना सिस्टीम सांगत होती की “ही दिल्ली नाही”. हे सिग्नल अमेरिकन जीपीएस उपग्रहांपेक्षा अधिक शक्तिशाली “खोट्या स्रोतां”कडून येत होते.

 

एअर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) पायलटांकडून तक्रारी ऐकत होते की त्यांच्या स्क्रीनवर धावपट्टीची चुकीची जागा दाखवली जात आहे. त्यामुळे तत्काळ मॅन्युअल नियंत्रण सुरू करण्यात आले, ऑटोपायलट बंद करून “इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम” वापरण्यात आली. काही विमानांना दुसऱ्या विमानतळांवर वळवण्यात आले आणि मोठा अपघात टळला.तपासा नुसार, हे शक्तिशाली खोटे सिग्नल उत्तर-पश्चिम दिल्ली परिसरातून येत होते. विशेषतः रोहिणी, नरेला, प्रीतमपूरा आणि आजादपूर या भागांमधून. या भागात NTRO (National Technical Research Organisation) आणि इतर फॉरेन्सिक लॅब्स कार्यरत आहेत. या संस्थांमध्ये नियमित रेडिओ आणि सिग्नल ट्रायल्स घेतल्या जातात. त्यामुळे तपास यंत्रणा याच दिशेने तपास करत आहे की, या प्रयोगांदरम्यान झालेल्या कोणत्या सिग्नल बिघाडीमुळे विमानांचे जीपीएस सिग्नल गोंधळले का?काही तज्ञांच्या मते, हे डिजिटल स्कूफिंग किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी जॅमिंग मुळेही झाले असावे. काही अवैध उपकरणांद्वारे सिग्नलमध्ये हस्तक्षेप झाला असावा, ज्यामुळे विमानांना चुकीची दिशा मिळाली.

 

नॉकिंगन्यूज डॉट कॉमचे पत्रकार गिरीजेश वशिष्ठ म्हणतात,“जसे आपण चुकीच्या रस्त्याने जात असताना एखादा माणूस ‘उजवीकडे वळा, नाहीतर पोलीस पकडतील’ असे सांगतो आणि आपण त्याच्या म्हणण्यावर गाडी पळवतो, पण समोर पोलीसच उभे असतात, तसाच प्रकार येथे घडला.”म्हणजेच, विमानांना त्यांच्या खऱ्या सॅटॅलाइट सिग्नलपेक्षा अधिक शक्तिशाली खोटे सिग्नल मिळत होते, आणि त्यामुळे जीपीएस नियंत्रण पूर्णपणे दिशाभूल झाले होते.

या सर्व घटनेची चौकशी एनटीआरओ आणि डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन करत आहेत. जर हा हल्ला हेतुपुरस्सर केला गेला असेल, तर तो दहशतवादी हल्ला (Aviation Terrorism) मानला जाईल.पत्रकार म्हणून आमचे काम फक्त युद्ध भडकवणे नसून, या प्रकारामागील खरी कारणे शोधणे हे आहे. दिल्लीतील या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानमध्ये सुद्धा स्फोट झाला. त्यामुळे या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे.शेवटी एवढेच म्हणावे लागेल की, ही घटना फार मोठ्या संकटातून वाचलेली आहे. सुदैवाने कोणाचाही जीव गेला नाही, पण यामुळे भविष्यातील हवाई सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!