नांदेड (प्रतिनिधी)— नांदेड ग्रामीण पोलिसांनी मौजे असर्जन प्रकल्पाजवळ गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर अवैधरित्या वाळू उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मध्यरात्री कारवाई करून ₹४८ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार गवेंद्र गंगाधर सिरमलवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलीस उपअधीक्षक प्रशांत शिंदे व पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार कांबळे, पोलीस अंमलदार शेख इब्राहिम, अर्जुन मुंडे, शेख जमीर, शेख आसिफ, आणि धम्मपाल कांबळे यांनी ही कारवाई केली. दहा ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे अकरा वाजता पथक गोदावरी नदीच्या असर्जन धरणाजवळ गेले असता एमएच २६-३१३२ क्रमांकाचा हायवा ट्रक आढळला. त्या वाहनात पाच ब्रास वाळू भरलेली होती. तसेच नदीपात्रातून वाळू उपसण्यासाठी वापरली जाणारी पाच तराफे व दोन इंजिन सुद्धा पोलिसांनी जप्त केली. या सर्व साहित्याची एकूण किंमत ₹४८ लाख ७५ हजार रुपये इतकी आहे.या प्रकरणात चालक विनोद अण्णाराव ढवळे आणि टिपर क्र. एमएच २६-३१३२ चे मालक अविनाश देशमुख यांच्यासह इतर दोन जणांविरुद्ध गुन्हा क्रमांक १०७४/२०२५ दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास नांदेड ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे. Post Views: 1,200 Facebook WhatsApp Twitter LinkedIn Post navigation अर्धापूर पोलिसांची ५२ म्हशी पकडल्या ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त हवाई सुरक्षेला धोका? दिल्ली आकाशात जीपीएस सिग्नल स्पूफिंगचा मोठा प्रकार