नांदेड(प्रतिनिधी)-डॉ.शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाचा एक दरवाजा काही वेळात 4.30 वाजता उघडला जाणार आहे. त्यातून 471 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होणार आहे अशी माहिती पुरनियंत्रण अधिकारी विष्णुपूरी यांनी प्रसारीत केली आहे.
आज 10 नोव्हेंबर रोजी डॉ.शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्प पुर्णपणे 100 टक्के क्षमतेने भरलेला आहे. सोबतच प्रकल्पाच्या पाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या सतत पावसामुळे प्रकल्पात पाण्याची पातळी वाढतच आहे. पाण्याची आवक लक्षात घेता त्यातून विसर्ग सुध्दा आवश्यक आहे. म्हणून आज दुपारी 4.30 वाजेच्याासुमारास विष्णुपूरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघला जाणार असून त्यातून 471 क्युमेक्स अर्थात 16632 क्युसेक्स पाणी विसर्ग होणार आहे.
पुरनियंत्रण अधिकाऱ्यांनी विष्णुपूरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजुला राहणाऱ्या सर्व नागरीकांना मालमत्ता आणि जिवीताची हाणी होवू नये तसेच पशुधन नुकसान होवू नये तसेच विटभट्टी साहिहत्याचे नुकसान होवू नये म्हणून प्रशासकीय स्तरावरुन नांदेड जिल्ह्यातील विष्णुपूरी बंधाऱ्याच्या खालच्या भागात राहणाऱ्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्याची सुचना केली आहे.
विष्णुपूरी प्रकल्पाचा एक दरवाजा 4.30 वाजता उघडणार; सर्कतेचा इशारा
