सचिव वृषाली जोगदंड यांची माहिती
नांदेड –महाराष्ट्र धनुर्वीद्या संघटनेच्या अंतर्गत अहिल्यानगर जिल्हा संघटनेच्या वतिने आयोजीत २२ व्या राज्यस्तर सिनीअर वरिष्ठ गट धनुर्वीद्या स्पर्धेसाठी नांदेड जिल्हयाच्या संघाची निवड चाचणी ११ नोव्हेबर २०२५ रोजी आर्चरी स्कुल श्री गुरु गोबिंदसिंघजी स्टेडीयम नांदेड येथे आयोजीत करण्यात आली असुन त्यात जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन आर्चरी संघटना नांदेड उपाध्यक्ष इंजि.हरजिंदर सिंघ संधू व सचिव तथा प्रशिक्षीका वृषाली पाटील जोगदंड यांनी केले आहे .महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या वतीने अहिल्यानगर येथे १५ ते १७ नोव्हेंबर २०२५ दरम्यान २२ व्या राज्यस्तर सिनीअर वरिष्ठ गट मुले मुली धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्यात निवडलेला महाराष्ट्राचा संघ राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे . सदरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नांदेड जिल्ह्याच्या संघाची निवड ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता आयोजित केली असून त्यामध्ये इंडियन , रिकर्व व कंपाऊंड प्रकारात महिला व पुरुष संघ निवडण्यात येणार आहे . यामधे . इंडियन राऊंडसाठी ५० व ३० मीटर डिस्टन्स तर रिकव्हर राऊंडसाठी डबल ७० मीटर , कंपाउंड राउंडसाठी डबल ५० मीटर अंतर असणार असून राज्य स्पर्धेत सहभागासाठी ड्रेस कोडही लागू करण्यात आला आहे खेळाडूंनी भारतीय आर्चरी संघटनेत नोंदणी करण्याचे प्रावधानही यात करण्यात आले आहे . जिल्ह्यातील इच्छुक खेळाडूंनी ११ नोव्हेबर २० २५ रोजी आवश्यक कागदपत्रासह योग्य क्रीडा गणवेशात आर्चरी स्कूल श्रीगुरुगोविंद सिंग जी स्टेडियम नांदेड येथे सकाळी ९ वाजता उपस्थित राहून निवड चाचणीत सहभागी होण्याचे आवाहन आर्चरी संघटना नांदेड जिल्हा उपाध्यक्ष इंजि.हरजिंदर सिंघ संधू , डॉ. हंसराज वैद्य , श्रीनिवास भुसेवार , मुन्ना कदम कोंडेकर, सुरेश तमलुरकर , शिवाजी पुजरवाड , मालोजी कांबळे , राष्ट्रपाल नरवाडे, सिद्धेश्वर शेटे, यांनी केले आहे .
अधिक माहितीसाठी जिल्हा संघटना सचिव वृषाली पाटील जोगदंड याचकडे ९४०४६६२३२२ या भ्रमणध्वनीवर संपर्क सांधण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे
