नांदेड जिल्ह्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) ची स्थानिक संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात शुक्रवारी तयारी बैठक

नांदेड(प्रतिनिधी) -आगामी होवु घातलेल्या नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे पुर्वतयारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच भारत सरकारचे सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले  यांच्या आदेशानुसार ही बैठक आज दि. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ (एक)वाजता रिपाई ( आठवले ) कार्यालय, आंबेडकर नगर नांदेड येथे होणार आहे.
या बैठकीचे नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) चे महाराष्ट्र राज्य संघटक विजयदादा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, मराठवाडा उपाध्यक्ष सुखदेव चिखलीकर, उत्तर जिल्हाध्यक्ष मिलिंद शिराढोणकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष गौतम काळे आणि महानगरअध्यक्ष धम्मपाल धुताडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडणार आहे.
बैठकीदरम्यान जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात रणनीती ठरविणे,संघटनात्मक बळकटीकरण, आघाड्यांचे समन्वयन आणि कार्यकर्त्यांच्या भूमिकेचे नियोजन यावर चर्चा होणार आहे.
सदर बैठकीस जिल्हा कमिटी, तालुका कमिटी, महिला आघाडी, युवक आघाडी तसेच संलग्न असलेल्या सर्व आघाड्या, जिल्हा, तालुका, वार्ड पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) नांदेड जिल्हा कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे बैठक स्थळ: रिपाई ( आठवले ) कार्यालय, आंबेडकर नगर नांदेड वेळ: ७ नोव्हेंबर २०२५, दुपारी १ वाजता सदर बैठक ही आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, जिल्ह्यातील सर्व रिपाई कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!