नांदेड(प्रतिनिधी)-पती-पत्नी दुचाकीवर जात असतांना पत्नीच्या खांद्यावर अडकवलेली 1 लाख 64 हजार रुपये ऐवजाची बॅग तीन अनोळखी चोरट्यांनी दुचाकीवर येवून बळजबरी चोरून नेली आहे. हा घटनाक्रम 2 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 1 वाजता डॉ.शंकरराव चव्हाण चौक कामठा येथे घडला आहे.
दिपक व्यंकटी शिरफुले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 नोव्हेंबर रोजी रात्री 1 वाजता ते आई आणि त्यांची पत्नी दुचाकीवर जात असतांना डॉ.शंकराव चव्हाण चौकात तीन अनोळखी लोक दुचाकीवर आले आणि त्यांच्या पत्नीच्या खांद्यावर अडकवलेली 1 लाख 64 हजार रुपये किंमतीचा ऐवज असलेली ती बॅग तीन चोरट्यांनी बळजबरीने चोरून नेली आहे. विमानतळ पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 446/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक साखरे हे करीत आहेत.
विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी
