नांदेड(प्रतिनिधी)-सोलार कंपनीची स्थापना बनावट पध्दतीने करण्यास लावून 36 लाख 70 हजार 444 रुपयांचा फसवणूक केल्याप्रकरणी हिमायतनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशोक रामजी अनुलवार या 63 वर्षीय व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार सन 2020 ते 2024 दरम्यान मौजे अंदेगाव ता.हिमायतनगर येथे त्यांना सोलार कंपनीची स्थापना करण्यास लावून पांडूरंग परसराम जाधव रा.बजाजनगर वाळू, छत्रपती संभाजीनगर व इतर सहकाऱ्यांनी 36 लाख 70 हजार 444 रुपयांची फसवणूक केली. सेवादास सोलार टेकनोलॉजीज प्रा.लि.कंपनी बंद असतांना ती चालू असल्याचे भासवून कंपनीच्या नावाने बनावट माहिती पुस्तिका, पावत्या आणि कागदपत्रे दिली. हिमायतनगर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 227/2025 भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406, 465, 467, 468, 470, 471, 34 प्रमाणे दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक शेख यांच्याकडे देण्यात आला आहे. Kanthak Suryatal Post Views: 938 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मोटार पंप चोरी सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षकांची ऑनलाईन फसवणूक