नांदेड(प्रतिनिधी)-एका मरण पावलेल्या मुलाच्या नावे बँकेत जमा असलेली 18 लाख रुपये रक्कम त्या मुलाच्या वडीलांनी काढून घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने या प्रकरणी शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कृष्णा सचिन कोळपे उर्फ कृष्णा देविदास कदम या महिलेने न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांचे पती सचिन दत्तात्रय कोळपे यांचे निधन झाले तेंव्हा त्यांना एक मुलगी होती आणि सचिनच्या खात्यात बँकेमध्ये 18 लाख रुपये जमा होते. त्यसानंतर दि.6 ऑक्टोबर 2024 ते 7 ऑक्टोबर 2024 दरम्यान सचिनचे वडिल दत्तात्रय गणपतराव कोळपे (68) रा.तरोडा (खु) यांनी सचिनची पत्नी कृष्णा आणि सचिनची मुलगी जानवी या दोघींना कोणतीही कल्पना न देता सचिनच्या नावावर एसबीआय बँक शाखा नवा मोंढा नांदेड येथे जमा असलेले 18 लाख रुपये परस्पर काढून घेवून विश्र्वासघात आणि फसवणूक केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी नांदेड यांनी आदेश दिल्यानंतर शिवाजीनगर पेालीसांनी दत्तात्रय गणपत कोळपे विरुध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 340(2) प्रमाणे गुन्हा क्रमांक 402/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक उमेश कदम हे करीत आहेत.
मयत मुलाच्या नावाचे 18 लाख रुपये सुनबाई आणि नातीला न सांगता काढून घेतले; गुन्हा दाखल
