नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यात कॉंगे्रस पक्षात नामांकित नेतृत्व असलेले अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षा रस्ता धरला आणि कॉंगे्रसची वाट नांदेड जिल्ह्यात लागली. नांदेड जिल्ह्यात कॉंगे्रसच्या बाहुल्यांचा खेळ अशोक चव्हाणच चालवितात असे बोलले जात होते. पण दि.30 ऑक्टोबर रोजी कधी काळी कॉंग्रेसचे पण आज भाजपचे मुखपत्र असलेल्या दैनिक सत्यप्रभामध्ये कॉंगे्रसच्या मुन्ना अब्बासची बातमी सत्यप्रभाच्या कॉम्प्युटरमध्येच तयार करून त्यांच्याच मेलवरुन इतर पत्रकारांना पाठविली या खेळाचा सुत्रधार कोण ? पण सुत्रधार कोणीही असेल तरी अशोक चव्हाणच कॉंगे्रस चालवित आहेत काय? यावर पुन्हा एकदा चर्चा करण्यास पुरावा मिळाला आहे. सुत्रधार हुशार असता तर स्वत:च्या व्यक्तीगत ईमेलवरुन ही बातमी प्रसारीत केली असती. किंवा सुत्रधारानेच अशोक चव्हाण यांची बदनामी करण्याची सुपारी घेतली की काय? असे अनेक प्रश्न या बातमीच्या प्रसारणामुळे तयार झाले आहेत.
नांदेड जिल्ह्यात एकत्रितपणे सर्व पत्रकारांना एखादी बातमी पाठवायची असेल तर त्यासाठी 250 ईमेल आयडी उपलब्ध आहेत. 30 ऑक्टोबर रोजी कॉंगे्रस पक्षाचे कोणी तरी बनवलेले नेते आणि माजी नगरसेवक मुन्ना अब्बास यांना कॉंगे्रस पक्षाने देगलूर मतदार संघाची पक्ष निरिक्षक म्हणून बातमी तयार झाली आणि ही बातमी दैनिक सत्यप्रभा या आयडीवरून फोटोसह सर्व पत्रकारंाना पाठविण्यात आली. ही बातमी लिहित असतांना कॉंगे्रस पक्षाचे नेते हनमंत पाटील बेटमोगरेकर यांनी नियुक्ती केल्याचा उल्लेख आहे.
ही बातमी आल्यानंतर पत्रकारांचे डोके चालणार नाही तर तो पत्रकार कसला. आजच्या परिस्थितीत सत्यप्रभा हे दैनिक खा.अशोक चव्हाण यांच्या नावाने ओळखले जाते. किंबहुना कधीकाळी कॉंगे्रसचे असलेले हे मुखपत्र आज भारतीय जनता पार्टीचे झाले आहे. हा परिस्थितीचा बदल आहे. कारण कोणत्या क्षणी आपलीच भुमिका आपल्याला बदलावी लागले. याचा काही नेम नसतो, त्याला अनेक कारणे असतात आणि ती सांगता येत नसतात. म्हणून सर्वांनीच हा घटनाक्रम कबुल करायला हवा. पण बहुदा सत्यप्रभामध्ये काम करणारे व्यक्तीमत्व एवढे हुशार आहेत की, त्यांना हा बदल कळलाच नाही. खा.अशोक चव्हाण कॉंगे्रस चालवत असतील तरी ही बाब उघड होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी त्यांच्या सेवकांचीच आहे. पण बातमीच्या प्रसारणामुळे ही गडबड उघड झाली आणि आजही नांदेडचा कॉंगे्रस पक्ष भारतीय जनता पार्टीचे खा.अशोक चव्हाण चालवितात काय? हा संभ्रम पत्रकारंाना झाला. हा संभ्रम जनतेसाठी सादर करणे आमची जबाबदारीच आहे. नाही तर आम्ही आमच्या लेखणीसोबत बेईमानी केल्यासारखे होईल. किंबहुना या बातमी मागे सत्यप्रभाचे कर्तेधर्ते यांनीच सुपारी घेतली आहे की, काय आणि ती सुध्दा खा.अशोक चव्हाण यांची याची तर प्रशंसाच करायला हवी.
कोणी घेतली खा.अशोक चव्हाणांच्या बदनामीची सुपारी?
