नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्रातील चोरांचे सरकार आहे. भल्याचे सरकार हवे असे तर देवेंद्र फडणवीसच्या खुर्चीत बसण्याची ताकत तयार करा. बाकीच्या आपल्या मागण्या आपोआपच मंजुर होतील असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
आज भटके, विमुक्त, बलुतेदार आणि इतर मागासवर्गीय यांच्या एल्गार मोर्चाच्या समारोप प्रसंगी ऍड. प्रकाश आंबेडकर बोलत होते. सकाळी हा मोर्चा नवा मोंढा परिसरातून सुरू झाला. डॉ.अण्णाभाऊ साठे चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचला. तेथे अनेकांची भाषणे झाली. या प्रसंगी लक्ष्मण हाके, ऍड. अविनाश भोसीकर, डॉ.बी.डी.चव्हाण आणि वाघमारे यांनी आपले विचार व्यक्त केले.
या प्रसंगी पुढे बोलतांना ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले देवेंद्र फडणवीसच्या खुर्चीत बसल्यानंतर 26 टक्के आरक्षणाचे 62 टक्के करता येते. याचे उदाहरण सांगतांना त्यांनी तेलंगणा राज्यात आज 62 टक्के आरक्षण आहे हे सांगितले. आज शिक्षणातील आरक्षण समाप्त करण्यात आले आहे. कारण शिक्षणाचे खाजगीकरण झाले आहे. सध्याच्या परिस्थितीत ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका या निवडणुकांमध्येच ओबीसीचे आरक्षण शिल्लक राहिले आहे. ओबीसींसाठी शिक्षण आरक्षण आणि नोकऱ्यांचे आरक्षण हवे असेल तर सत्ता हातात घ्यावी लागते.
याप्रसंगी ईतिहासातील एक उदाहरण सांगितांना ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पेशव्यांनी तिन वेळा दिल्लीच्या तख्तावर आक्रमण केले. जिंकण्याची वेळ आली. तेंव्हा दिल्लीचे तख्त आम्हाला नको पण वसुली करण्याचा अधिकार आमच्याकडेच असावा अशी मागणी केली. आजच्या सरकारची मानसिकता सुध्दा तीच आहे. वसुलीची मानसिकता असलेल्या सरकारकडून ओबीसी आरक्षण मिळणार नाही. ईतिहासाबद्दल महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगत असे की, जो ईतिहास ओळखतो, जो ईतिहास जानतो, जो ईतिहास समजतो तोच नवीन ईतिहास घडवू शकतो. आणि नवा ईतिहास घडविण्यासाठी आरक्षणाची अपेक्षा असणाऱ्या सर्वांनीच सत्ता मिळवणे आवश्यक आहे. पण तुम्हाला सरकार हिंदु धर्म संकटात आहे असे सांगून अडकून ठेवते. धर्माच्या नावावर सुरू असलेले हे राजकारण पुढच्या कालखंडात त्याचे खापर ओबीसींवर फोडणार आहे.
सध्या पावसाच्या परिस्थितीवर बोलतांना ऍड. आंबेडकर म्हणाले वरुण राजा थांबायला तयार नाही. एका शेतकऱ्याने मला सांगितले की, वरुण राजा आमचा बदला घेत आहे. मी त्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की, आरक्षण विरोधकांनाच आम्ही सत्तेवर बसवतो आहे आणि म्हणून वरुण राजा आमचा बदला घेत आहे.
1980 पासून आरक्षणाचा विषय सुरू झाला. त्यावेळी मोरारजी देसाई पंतप्रधान होते. त्यावेळी अधिक संकेत असणाऱ्या ओबीसी खासदारांनी मंडल कमीशनची मागणी केली. ती मागणी मोरारजी देसाई यांना मान्य नव्हती. तेंव्हा ओबीसी खासदारांनी सर्व खासदारांची बैठक बोलविण्याचे पत्र दिले. यावेळेस मात्र मोरारजी देसाई यांना भिती वाटली की, आपले सरकार जाईल. म्हणून त्यांनी मंडल स्थापन केले आणि कमिशन तयार केले. त्यावेळी कमिशनने जो अहवाल दिला होता. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी 1990 उजाडले. त्यावेळी व्ही.पी.सिंह पंतप्रधान होते. आपले सरकार टिको किंवा नको टिको म्हणून त्यांनी ओबीसी गणणेचा निर्णय घेतला आणि ओबीसी आरक्षण पुर्ण झाले. कमिशनने केलेल्या शिफारशी भारतीय संविधानाच्या अनुरुप नाहीत. म्हणून ही लढाई न्यायालयात आली. 36 वकीलांच्या विरोधात ऍड. रामजेठमलानी यांनी मंडल कमिशनच्या शिफारशी कशा प्रकारे घटनेच्या अनुरूप आहेत हे दाखविले आणि तेंव्हा हा ओबीसीचा लढा पुर्णत्वाकडे मार्गक्रमण करू लागला.
मोदी आज वेडा-पिसा झाला आहे. मीच जगाचा विश्र्वगुरु आहे म्हणून सर्व जगाच्या राष्ट्रप्रमुखांनी मला सलाम ठोकावा अशी त्याची धारणा झाली आहे. परंतू यामुळेच अनेक देश आज भारताच्या विरोधात गेले आहेत आणि या परिस्थितीत रशिया पाकिस्तानला लढावू विमाने देणार आहेत अशा बातम्या आल्या. आता 17 देशांविरुध्द एक देश मग जिंकणार कोण? हा प्रश्न त्यांनी प्रेक्षकांसाठी ठेवला. याचा अर्थ असाच आहे की, तुम्हाला वेगवेगळ्या कारणांमध्ये अडकवून सत्ता चालविण्याचा हा धंदा सुरू आहे. आता या परिस्थितीत मोदीला वाचवावे की, देश वाचवावा हे आपण ठरवायचे आहे.
मागच्या विधानसभा निवडणुकींमध्ये ओबीसींवर हल्ले झाले. पण तुम्ही ज्या राजकीय पक्षांना मतदान केले. त् यातील उमेदवार मराठाच होता. म्हणजे चुकीचे राजकारण कसे करावे, आपल्या पायावर धोंडा कसा मारुन घ्यावा हे ओबीसींकडून शिकावे असा टोला ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी मारला.आजच्या परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आल्या आहेत. ज्याप्रमाणे मी भारताचा स्वतंत्र नागरीक आहे. मला भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार पंतप्रधानांना शिव्या देण्याचा अधिकार सुध्दा आहे. तो आता ओबीसींनी वापरावा आणि दाखवून द्यावे की, आम्हाला व्यक्तीपेक्षा देशप्रिय आहे.
महाराष्ट्राचे सरकार चोरांचे सरकार-ऍड. प्रकाश आंबेडकर
