नांदेड(प्रतिनिधी)-कॉंगे्रस पक्ष प्रवेश सोहळा आणि कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने मी नांदेड जिल्ह्याच्या दौर्यावर आलो असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या बाबतीत जो काही आघाडीचा निर्णय आहे तो निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जावा. मी आघाडी करणार नाही असे मते कॉंगे्रस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.
या पत्रकार परिषदेला खा.रविंद्र चव्हाण, अनिल मोरे, जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, कॉंगे्रस प्रवक्ते मुन्तजिबोद्दीन, सत्यपाल सावंत यांची उपस्थिती होती. यावेळी सपकाळ पुढे बोलतांना म्हणाले की, कॉंगे्रस पक्षाला गळती लागली होती. हे मात्र त्यांनी कबुल केल. अद्यापही मनसेकडून कोणताही युतीचा प्रस्ताव आला नाही. याचबरोबर अतिवृष्टीमुळे शेतकर्यांची प्रचंड नुकसान झाली आहे. शासनाने शेतकर्यांना 50 हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी नांदेड येथूनच केली होती. याचबरोबर शेतकर्यांचे सर्व कर्ज माफ करावे. सरकार हे माय-बापच्या भुमीकेत नाही. हे सरकार शेतकर्यांचे नसून व्यापार्यांचे असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. सोयाबिन खरिदीची पध्दत बदलली असून पनन मंत्री पाकिटांची वाट पाहत आहेत. गृहविभागाकडूनही हप्ते वसुलीचा आरोप त्यांनी यावेळी केला. पुणे येथील जैन जमीनी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी कॉंगे्रस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत केली.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आघाडी नाही-सपकाळ
