नांदेड(प्रतिनिधी)-नसरपूर शिवारातील रेल्वे रुळांजवळ एक 35 वर्षीय पुरुष जातीचे प्रेत सापडले आहे. हे अनोळखी आहे. त्यासाठी भाग्यनगर पोलीसांनी याबाबत शोध पत्रिका निर्गमित केली आहे.
पोलीस ठाणे भाग्यनगर येथे पोलीस अंमलदार सी.जी. सोनटक्के बकल नंबर 1263 यांच्या खबरीवरुन आकस्मात मृत्यू क्रमांक 7/2025 दाखल झाला आहे. 23 ऑक्टोबर रोजी नसरपूर शिवारातील रेल्वे पटरीजवळ खांब क्रमांक 346/12 -14 आणि 346/11-13 या दोघांच्या मध्ये एक 35 वर्षीय पुरूष जातीचे प्रेत सापडले आहे. त्या व्यक्तीचे दोन्ही पाय कापले गेले आहेत.
भाग्यनगर पोलीसांनी या संदर्भाने शोध पत्रिका जारी केली आहे. अनोळखी मरण पावलेल्या माणसाचा रंग सावळा आणि केस काळे आहेत. चेहरा लांबट आहे. त्याच्या शरिरावर अंडर गारमेंट राखोडी रंगाची आहे. उजव्या हातावर गोंधलेले आहे. उजव्या हाताच्या मनगटात स्टिलचे कडे आहे. पांढरा व लाल रंगाचा हाफ बाह्यांचा टी-शर्ट आहे. पॅन्ट काळ्या रंगाची आहे. उंची 5 फुट 2 इंच आहे. शरिर सडपातळ आहे. हे प्रेत सध्या शासकीय रुग्णालय विष्णुपूरी येथे शितगृहात ठेवलेले आहे. पोलीस निरिक्षक संतोष तांबे यांच्या मोबाईल क्रमांक 9850188100, पोलीस ठाणे भाग्यनगरचा दुरध्वनी क्रमांक 02462-261364 आणि पोलीस अंमलदार सी.व्ही. सोनटक्के यांचा मोबाईल क्रमांक 9923171263 यावर ज्या नागरीकांना या अनोळखी मयत माणसाबद्दल माहिती असेल त्यांनी संपर्क साधून माहिती द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
अनोळखी व्यक्तीचे प्रेत सापडले; पोलीसांचे जनतेला ओळख पटवून देण्यासाठी आवाहन
