नायगाव : नायगाव तालुक्यातील मुस्तापूर येथील ज्येष्ठ नागरिक पंचफुलाबाई गंगाराम विरभद्रे यांचे आज दिनांक २१ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता दुःखद निधन झाले आहे. त्या ७० वर्षांच्या होत्या.
दिवंगत पंचफुलाबाई गंगाराम विरभद्रे यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता मुस्तापूर येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्या मुस्तापूर ग्राम पंचायत चे माजी सरपंच गंगाराम विरभद्रे यांच्या पत्नी तर नरसी येथील राणी लक्ष्मीबाई ज्युनिअर कॉलेजचे प्रा. भगवान वीरभद्रे यांच्या त्या मातोश्री होत.
