गूढतेची सावली… वेळकोणी येथे 45 वर्षीय व्यक्तीचा खून .. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

बिलोली (प्रतिनिधी)- बिलोली तालुक्यातील बेळकोणी (बु) या शांत गावात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. 16 ऑक्टोबरच्या सकाळी 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात भितीचे आणि धास्तीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी रामतीर्थ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तक्रारीनुसार, त्रिकोणी (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील शंकर बालन्ना मोडेवार (वय 45) यास बेळकोणी येथील हनुमंत किशन गालेवार यांनी अज्ञात कारणासाठी बोलावून नेले आणि त्यांचा खून केला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याला जाळल्याचे उघड झाले आहे. ही थरकाप उडवणारी घटना 15 ऑक्टोबरच्या रात्री आठ ते 16 ऑक्टोबरच्या पहाटे सहा वाजेदरम्यान घडल्याचा प्राथमिक तपासात निष्कर्ष आहे.

 

या प्रकरणी संगीता अशोक भुरेवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक 309/ 2025 नोंदविण्यात आला आहे. घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

 

गुन्ह्याचा तपास रामतीर्थचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, घटनास्थळी तांत्रिक पथकानेही पाहणी केली आहे. पोलिसांनी पुरावे गोळा करून पुढील तपास जलदगतीने सुरू केला आहे.एका साध्या दिसणाऱ्या रात्रीत घडलेल्या या काळजाला चिर देणाऱ्या घटनेने वेळकोणी गावात खळबळ माजली आहे. रामतीर्थ पोलिसांनी मारेकऱ्याला पकडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!