नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी 25 हजारांची अवैध वाळू वाहतुक करणारा 30 लाखांचा हायवा टिपर पकडला आहे.
दि.8 ऑक्टोबर रोजी रात्री नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार शेख इब्राहिम, डफडे, शेख जमीर, धम्मपाल कांबळे हे गस्त करत असतांना त्यांना माहिती मिळाली की, पिंपळगाव ते वाडीपाटीकडे एक टिपर वाळू भरून येत आहे. पोलीस पथकाने वाडी पुलाखाली गाडी क्रमांक एम.एच.26 सी.एच.7237 थांबवली. त्यामध्ये अवैध पध्दतीने भरलेली 3 ब्रास वाळू 25 हजार रुपये किंमतीची भरलेली होती. धम्मपाल कांबळे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 959/2025 दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधिक्षक प्रशांत शिंदे यांनी 30 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त करणाऱ्या पोलीस पथकाचे अभिनंदन केले आहे.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी 30 लाखांचा हायवा आणि 25 हजारांची वाळू पकडली
