अर्धापूर (प्रतिनिधी)-बसमध्ये प्रवेश करत असताना एका ५७ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना अर्धापूर येथे घडली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा प्रभाकर माळवे (रा. विजयनगर, नांदेड) या २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अर्धापूर बसस्थानकात अर्धापूर ते नांदेड जाणाऱ्या बसमध्ये प्रवेश करत होत्या. याच दरम्यान त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे, अंदाजे १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्यांनी चोरले.या प्रकरणी मनीषा माळवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 562/2025 नोंदविण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक भोसले हे अधिक तपास करीत आहेत.
