नांदेड(प्रतिनिधी)-गुरुद्वारा बोर्डाच्या एका धार्मिक प्रकरणात झालेल्या आर्थिक घोटाळाप्रकरणी मुंबईच्या ऍड. अमृतपालसिंघ खालसा यांनी मागितलेली माहिती माहिती अधिकारी आणि प्रथम अपीलीय अधिकारी यांनी न दिल्याने छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त प्रकाश इंदलकर यांनी नाराजी व्यक्त करत अममृतपालसिंघ खालसा यांनी मागितलेली माहिती त्वरीत प्रभावाने देण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई येथील ऍड. अमृतपालसिंघ खालसा यांनी दि.25 ऑक्टोबर 2022 रोजी गुरुद्वारा बोर्डाकडे एका धार्मिक प्रकरणात झालेला आर्थिक अपहरणाचा प्रकार संदर्भाने 4 माहिती मागितल्या होत्या. या संदर्भाने माहिती मिळाली नाही म्हणून ऍड. अमृतपालसिंघ खालसा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका क्रमांक 9956/2023 दाखल केली. या याचिकेत उच्च न्यायालयाने 16 डिसेंबर 2025 रोजी दिलेल्या निर्देशानुसार जनमाहिती आयुक्तांनी दुसऱ्या अपीलाची सुनावणी घेतली. त्या सुनावणीदरम्यान गुरुद्वारा बोर्डाचे माहिती अधिकारी आणि अपीलय अधिकारी यांच्यावतीने सहाय्यक अधिक्षक उपस्थित होते. उच्च न्यायालयाने चार आठवड्यात निर्णय घ्यावा असे आदेश दिले होते. त्यानुसार माहिती आयुक्तांनी हा दुसऱ्या अपीलाचा प्रकार सुनावणीला घेतला. यामध्ये माहिती न दिल्याच्या कारणावरुन राज्य माहिती आयुक्त प्रकाश इंदलकर यांनी बरेच ताशेरे ओढले आहेत. संबंधीतांवर कार्यवाही व्हावी असे सुचवले आहे आणि ऍड. अमृतपालसिंघ खालसा यांनी मागितलेल्या चार माहित्या 30 दिवसांच्या आत विनाविलंब उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. Kanthak Suryatal Post Views: 832 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अमेरिकेचा डाव, बांग्लादेशला महामार्ग आणि भारताचा टेक्स्टाईल उद्योग धोक्यात! नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार; कुख्यात आरोपीकडून आरोपी युवकावर हल्ला,