इतवारा पोलीसांनी काही तासातच सव्वा लाखांची चोरी करणारा चोरटा पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-साईनगर, खोजा कॉलनी येथे 24 सप्टेंबर रोजी झालेल्या चोरीचा शोध इतवारा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने अत्यंत जलदगतीने लावत आरोपीला अटक करून संपुर्ण सव्वा लाखांपेक्षा जास्त चोरी गेलेला ऐवज जप्त केलेला आहे.
दि.25 सप्टेंबर रोजी हमीद खान गौस खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते आणि त्यांचे कुटूुंबिय साईनगर, खोजा कॉलनी येथील आपल्या घराच्या हॉलमध्ये कुटूंबासोबत जेवन करत असतांना कोणी तरी चोरट्यांनी त्यांची नजर चुकवून घराच्या वरच्या मजल्यावर कपाटात ठेवलेले सोन्याची मोरणी, सोन्याचे गंठण, सोन्याच्या तिन अंगठ्या असा 1 लाख 25 हजार 773 रुपयांचा ऐवज चोरू नेला होता. याप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 303/2025 दाखल करण्यात आला होता.
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनात इतवारा येथील पोलीस निरिक्षक रणजित भोईटे, संजय शिंदे, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक रमेश गायकवाड, पोलीस अंमलदार धीरज कोमुलवार, लक्ष्मण दासरवाड, रेवणनाथ कोळनुरे, हरप्रितसिंघ सुखई यांनी अत्यंत जलदगतीने कार्यवाही करत काही तासातच मिलतनगर, देगलूर नाका येथील मोहम्मद मुजाहिद मोहम्मद हाजी यास पकडले आणि त्याच्याकडून चोरी गेलेला संपुर्ण ऐवज जप्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!