भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा सेवेतील शेवटचा कालखंड विविध कारणांमुळे चर्चेचा विषय ठरला.या कालावधीत त्यांनी घेतलेले काही निर्णय, तसेच श्री गणेश पूजनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग आणि त्याचे व्हायरल झालेले फोटो व व्हिडीओमुळे त्यांच्या वर्तनावर अधिक चर्चा होऊ लागली.

“Why the Constitution Matters” हे पुस्तक त्यांनी लिहिल्यानंतर अनेक माध्यमांनी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतींमध्ये त्यांना विचारले गेलेले काही प्रश्न कठीण होते, कारण त्यांच्या निर्णयांमध्ये आणि जनतेसमोर दिसलेल्या वर्तनामध्ये विसंगती जाणवत होती.पुस्तकाच्या प्रमोशनसाठी चंद्रचूड वेगवेगळ्या चॅनल्सवर मुलाखती देत होते. त्यांनी लल्लनटॉप मधील सौरभ त्रिवेदी यांच्यासोबत एक मुलाखत दिली, तसेच इंडिया टुडे च्या राजदीप सरदेसाई यांनाही मुलाखत दिली.या मुलाखतीदरम्यान राजदीप सरदेसाई यांनी चंद्रचूड यांना एक थेट प्रश्न विचारला:“अर्णव गोस्वामी यांना झपाट्याने सुनावणी घेऊन जामीन मिळतो, पण सिद्दीक कप्पन याला दोन वर्षांहून अधिक काळ जामीन मिळत नाही. शरजील इमामसारख्या व्यक्तींच्या खटल्यांची सुनावणीसुद्धा वर्षानुवर्षे सुरू होत नाही. मग कायदा सर्वांसाठी समान आहे का?”

राजदीप सरदेसाई यांनी हेही विचारले की जामीन देण्यात न्यायालयांमध्ये वेगळी भूमिका का दिसते? अर्णव गोस्वामी यांच्यावर UAPA (गैरकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा) लागू होऊनही त्यांना दोन दिवसांत जामीन मिळतो, तर मुस्लिम व्यक्तींना वर्षानुवर्षे सुनावणीही मिळत नाही.या प्रश्नांना चंद्रचूड यांचे उत्तर टाळणारे, सामान्यीकरण करणारे होते, असे स्पष्ट दिसून आले.दरम्यान, आजही शरजील इमाम याच्या सुनावणीसाठी दिल्ली पोलिसांना केवळ नोटीस पाठवली जाते आणि नवीन तारीख दिली जाते.
याच मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती नरिमन यांनी भाष्य करत म्हटले की,“कोणत्याही न्यायाधीशाने जर दैवी शक्तीच्या हस्तक्षेपावर निर्णय घेतला, तर तो संविधानाच्या शपथेचे उल्लंघन करत आहे. न्यायाधीशांनी केवळ संविधान आणि कायद्याच्या अधीन राहूनच निर्णय द्यायला हवेत.”हे वक्तव्य अप्रत्यक्षपणे चंद्रचूड यांच्याच संदर्भात होते, कारण त्यांनी एका भाषणात सांगितले होते की,“राम जन्मभूमी प्रकरणाचा निकाल देताना मी प्रभू श्रीरामांची आराधना केली व त्यांच्याकडून मार्गदर्शन मागितले.”हे वक्तव्य लक्षात घेता, नरिमन यांनी दिलेले विधान म्हणजे न्यायव्यवस्थेतील धर्माच्या हस्तक्षेपाविरुद्धचे कठोर मत होते.
राजदीप सरदेसाई यांची मुलाखत गाजली कारण त्यांनी स्पष्टपणे असा प्रश्न विचारला होता की,“धनंजय चंद्रचूड यांच्याकडून न्यायाची समानता अपेक्षित असताना, वेगवेगळ्या व्यक्तींवर कायदा कसा वेगवेगळा लागू होतो?”याचदरम्यान, चंद्रचूड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या घरी श्री गणेश पूजनासाठी आमंत्रित केले आणि त्या पूजनाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. यावर काही पत्रकार व विश्लेषकांनी टीका केली.
Aditi (4PM News) या पत्रकार म्हणाल्या,
“एखाद्या न्यायाधीशाने धार्मिक पूजेला आपल्या घरी आमंत्रित करणे आणि त्याचे सार्वजनिक प्रदर्शन करणे हे अशोभनीय आहे. आपला वैयक्तिक विश्वास वेगळा असू शकतो, पण न्यायालयीन पदावर असताना तो व्यक्त करणे अयोग्य आहे.”हीच भावना माजी न्यायमूर्ती नरिमन यांनी त्यांच्या विधानांतून व्यक्त केली होती –“संविधानाच्या शपथेबाहेर जाऊन कोणी निर्णय घेत असेल, तर तो संविधानाचा अपमान आहे.”
केस
अशा अनेक घटनांमुळे आता प्रश्न उपस्थित होत आहे की,
“धनंजय चंद्रचूड यांच्या कार्यकाळाच्या अखेरीस जे काही घडले, ते त्यांच्या आधीच्या प्रतिमेला साजेसे होते का?”
की त्यांच्यावरही आता त्यांच्या कामाची फळे त्यांच्या याच जीवनात भोगावी लागत आहेत?
