नांदेड–युवा नेते बंटीभाऊ लांडगे यांच्यावतीने शहरातील प्रभाग क्रं.18 मधील बौध्द विहारातील महिला पदाधिकार्यांना साडी व लुगड्याचे वाटप करण्यात आले.
बंटीभाऊ लांडगे यांच्यावतीने नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. बौध्द विहारातील महिला भगिनींच्या सामाजिक कार्याची जाणीव ठेवत बंटीभाऊ लांडगे यांनी पुढाकार घेत सतत समाज कार्यात अग्रेसर असणार्या बौध्द विहारातील महिला पदाधिकार्यांचा छोटासा सन्मान म्हणून सर्व महिला भगिनींचा त्रिपिठक बौध्द विहार येथे सत्कार करत उपस्थित सर्व महिलांना साडी व लूगड्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सामाजीक कार्यकर्त्या श्रीमती कमलबाई लांडगे, वृषाली बंटी लांडगे, चांदू पंडीत, सचिन सीरसिला, भालचंद्र गवारे, दिपक पंडीत, सुदर्शन राजभोज, अबू उमेर, राजू ढगे, दिपक बारडकर, अनील थोरात, मधुकर हनमंते, शंकर तारू, भिमाशंकर नरवाडे, सुभाष ढगे, गोडबोले, उमेश इंगोले, संदेश नरवाडे यांच्यासह बौध्द उपासक, उपासिका यांची उपस्थिती होती.
