पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 47 उमेदवारांची प्राथमिक निवड

नांदेड :- नांदेड जिल्हृयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी. यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , नांदेड व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अर्धापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 19 सप्टेंबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण अर्धापूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्यात एकूण 7 नामांकित उद्योजक, शाळा तसेच इतर आस्थापनांच्यावतीने मुलाखती घेण्यात आल्या. तर एकूण 377 रिक्तपदांसाठी 220 उमेदवारांनी मुलाखत दिल्या. त्यापैकी 47 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त, डॉ. रा.म.कोल्हे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वादे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!