लिफ्टचे साहित्य चोरीस; कृपा हॉस्पिटलमधून २.४० लाखांचा ऐवज गायब

नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील कृपा हॉस्पिटलमध्ये १८ सप्टेंबर रोजी सकाळी अवघ्या अर्ध्या तासात पाचव्या मजल्यावरून २ लाख ४० हजार रुपयांचे लिफ्टचे साहित्य चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

 

डॉ. विशाल गंगाधरराव मुधोळकर (मालक, कृपा हॉस्पिटल) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १८ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० ते ११ या वेळेत, हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरील लिफ्टचे चार आरडी बॅटऱ्या व एक लिफ्ट ट्रान्सफॉर्मर असा एकूण ₹२,४०,००० किंमतीचा साहित्य चोरीला गेला आहे.या घटनेमुळे हॉस्पिटल व्यवस्थापनामध्ये खळबळ उडाली असून, सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांनी तत्काळ गुन्हा क्रमांक ३९४/२०२५ नोंदवून तपास सुरू केला आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील बुलंगे हे करत असून, हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फूटेज व परिसरातील हालचालींचा बारकाईने अभ्यास करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!