गोवर-रुबेला लसीकरण मोहीम भोकर शहरात सुरुवात 

भोकर :- राज्यामधील आश्रमशाळा व मदरसा मधील विद्यार्थी यांना गोवर-रुबेला उद्रेक दिसून आला आहे. त्या अनुषंगाने भोकर शहरातील आश्रमशाळा व मदरसा मध्ये दि.१५ ते ३० सप्टेंबर दरम्यान वय ५ ते १५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना गोवर-रुबेला लसी ची एक अतिरिक्त मात्रा देण्यात येणार आहे. नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ.राजाभाऊ बुट्टे यांच्या नियोजनानुसार व भोकर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रताप चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदेश जाधव यांच्या सुचनेनुसार भोकर शहरातील २ आश्रमशाळा, २ मदरसा मध्ये आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार, सुरेश पाईकराव यांनी कृती नियोजन करून गोवर -रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

आज दि.२० सप्टेंबर रोजी दारूलुम सिदिखियम मदरसा व वस्तीगृह म्हैसा रोड भोकर येथे गोवर – रुबेला लसीकरण मोहीमची सुरुवात करण्यात आली व १०१ बालकांना लसीकरण करण्यात आली. यावेळी मदरसाचे मौलाना निजाम मलिक (अध्यक्ष) मुफ्ती इम्रान कुरेशी (उपाध्यक्ष) मौलाना हे उपस्थित होते. दि.२३ सप्टेंबर प्राथमिक आश्रमशाळा डोंगरे कॉर्नर नांदेड रोड, दि. २४ सप्टेंबर कै.कुसुमताई शंकरराव चव्हाण (अनुदानित) आश्रमशाळा, दि. २६, २७ मदरसा कसिमलू शाळा किनवट रोड येथे गोवर -रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. आयुष डॉ मुद्दशिर, डॉ विनायक थोरवट, आरबीएसके डॉ व्यंकटेश टाकळकर, डॉ अविनाश गुंडाळे, डॉ ज्योती यन्नावार,डॉ अपर्णा जोशी, डॉ चंद्रे, डॉ.ज्योती सोनटक्के वैद्यकीय अधिकारी, लसीकरण समन्वयक गजानन तम्मलवाड, लसटोचक आरोग्य सेविका श्रीमती सरस्वती दिवटे, मुक्ता गुट्टे, संगीता पंदीलवाड, लेखनीक आरोग्य कर्मचारी नामदेव कंधारे,ऑनलाईन नोंदणी योगेश पवार, आरोग्य कर्मचारी गणपत पवार, प्रवीण पोहरे, मयूर बदकुले, ऍम्ब्युलन्स १०२ वाहन चालक सोहेल शेख, अंगणवाडी सेविका श्रीमती प्रणिता दुधारे, कांताबाई चंद्रे हे या गोवर-रुबेला लसीकरण मोहीम मध्ये काम करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!